मॅट्रिकपुर्व विविध शिष्यवृत्ती प्रस्ताव विहीत कालावधीत सादर करावेत
मॅट्रिकपुर्व विविध शिष्यवृत्ती प्रस्ताव
विहीत कालावधीत सादर करावेत
लातूर,दि.3 (जिमाका)-
जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, जि.प. प्रशाला, जि.प.
कन्या प्रशाला, जि.प. केंद्रिय प्रा.शा. सर्व शासनमान्य खाजगी अनुदानित / विनाअनुदानित
प्राथमिक / माध्यमिक शाळा यांनी मॅट्रिकपुर्व विविध शिष्यवृत्ती प्रस्ताव अचूक परिपूर्ण
माहिती विहीत प्रपत्रात विहीत कालावधीत गटशिक्षण कार्यालयाच्या कार्यालयात सादर करण्याचे
आवाहन समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे व समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी
केले आहे.
जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत भारत सरकार मॅट्रिकपुर्व
शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यावसायातील पालकांच्या मुलांना
शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षणसंस्थेतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, माध्यमिक शाळेतील
विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, दिव्यांग शिष्यवृत्ती व इ. 10 वी तील विद्यार्थ्यांना
परिक्षा फी माफी योजना ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना
उपरोक्त योजनांचा लाभ देण्यात येतो. सन 2019-20 पासून इतर मागास वर्ग तसेच विजाभज प्रवर्गातील
विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.
उपरोक्त सर्व योजनाचे प्रस्ताव विहीत प्रपत्रात योजनेच्या अटीस
व शर्तीस आधीन राहून मुख्यध्यापकाच्या स्वाक्षरी सह तथा गटशिक्षण अधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरीसह
Hard व Soft Copy सह दिनांक 15 फेब्रुवारी
2022 पर्यंत तयार करुन तालूकास्तरावर गटशिक्षण अधिकारी कार्यालयात सादर करावयाची आहे.
Soft Copy तील माहिती अचुकरित्या संकलनाकरिता सीडी मध्येच सादर करण्याबाबत सुचित करण्यात येत असून
CD वर संबंधीत शाळेचे नाव अचुकपणे नमूद करण्याबाबत कळविण्यात येत आहे. हे करताना कोव्हिड
संबंधी वेळोवेळी प्रसिध्द होणाऱ्या शासकीय नियमाचे पालन करावयाचे असून नियमाचे उल्लंघन
होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
0000
Comments
Post a Comment