दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांची उमंग सेंटरला भेट

 

दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख

यांची उमंग सेंटरला भेट

 

       लातूर,दि.14(जिमाका):- उमंग इन्सिटट्यू ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटर, लातूर येथे आयुक्त ओमप्रकाश देशमुख दिव्यांगकल्याण आयुक्तालय पुणे यांनी उमंग सेंटरला भेट दिली असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी  जिल्हा परिषद सुनिल खमितकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

       या सेंटरमध्ये चालविण्यात येणाऱ्या दिव्यांग मुलांसाठी न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट, अर्ली इंटर्वेशन, ऑक्युपेसनल थेरपी, स्पीच थेरपी, बिहेवियर थेरपी, सायकॉलॉजिकल थेरेपी, फिजियोथेरेपी, स्पेशल एज्युकेशन व विशेष सेन्सरी पार्क या सर्व ट्रीटमेंट व थेरपी ची प्रत्येक्ष पाहणी करुन माहिती घेतली. उमंग सेंटर हे देशातील अतिशय चांगले तसेच राज्याला दिशा देणारे सेंटर आहे असे गौरउदगार काढले. या भेटी दरम्यान उमंग सेंटर हे भारतातील पहिले सेंटर असून या उपक्रमाची संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी विषद केली. तसेच सेंटरमधील चालविण्यात येणाऱ्या सर्व थेरेपीची माहिती डॉ. प्रशांत उटगे यांनी दिली. तसेच जिल्हा परिषदेचे व उमंग सेंटर मधील थेरपिस्ट तसेच कर्मचाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

     लातूर ऑटीझम सेंटरच्या धरतीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑटीझम सेंटर उभारणेबाबत मनोगत व्यक्त केले. तसेच सेंटर सक्षमपणे चालविण्यासाठी सुचना व निर्दश दिले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी उमंग सेंटर जास्तीत जास्त प्रभावीपणे चालविण्यासाठी व दिव्यांगाच्या कल्याणासाठी प्रशासनामार्फत विशेष प्रयत्न केले जातील असे नमुद केले आहे.

        या भेटीच्या वेळी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण अविनाश देवसटवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, सचिव सिध्दिविनायक प्रतिष्ठान लातूरचे किरण उटगे तसेच लातूर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

                                                       0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु