महाडिबीटी पोर्टल वर शिष्‍यवृत्‍ती अर्ज 28फेब्रुवारी पर्यंत भरावे

 

महाडिबीटी पोर्टल वर

शिष्‍यवृत्‍ती अर्ज  28फेब्रुवारी  पर्यंत भरावे

 

लातूर,दि.22,(जिमाका):-जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी यांनी शिष्‍यवृत्‍ती चे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास दि.28 फेब्रुवारी 2022  ही अंतीम मुद्दत देण्‍यात आलेली आहे. तरी सर्व महाविद्यालयाचे  प्राचार्य शिष्‍यवृत्‍तीचे काम पहाणारे कर्मचारी-यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्‍याचे अर्ज विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरून सादर करण्‍याचे आवाहन सहायक आयुक्‍त,  समाजकल्‍याण लातूर यांनी केले आहे.

जिल्‍हयातील सर्व शासन मान्‍यता प्राप्‍त अनुदानित/ विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित महाविदयालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्‍ये प्रवेश घेतलेल्‍या अनुसूचित जाती , विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थीनी सन २०२1-22 या वर्षासाठी भारत सरकार शिष्‍यवृत्‍ती (GOI) व शिक्षण शुल्‍क, परीक्षा शुल्‍क (FREESHIP), राजर्षी शाहू महाराज गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती, व्‍यावसायिक पाठयक्रमांशी संलग्‍न असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना निर्वाह भत्‍ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्‍यासाठी महाडिबीटी हे पोर्टल  दि- 14 डिसेंबर 2021 सुरु करण्‍यात आलेले आहे.

ज्‍या विद्यार्थ्‍यांनी महाडिबीटीवर यापूर्वी आधार संलग्‍नीत युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत त्‍यांनी नवीन नॉन आधर युजर आयडी तयार करु नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरुन  अर्ज नुतनीकरण केल्‍यास व एका पेक्षा जास्‍त युजर आयडी तयार केल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयांची राहील.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु