आद्यगुरु रेणुकाचार्य सांस्कृतिक भवन व न्यायालयीन परिसरात विधीज्ञ सभाग्रह बांधकामासाठी दोन कोटीचा निधी मंजूर - राज्यमंत्री संजय बनसोडे
आद्यगुरु रेणुकाचार्य
सांस्कृतिक भवन व न्यायालयीन परिसरात विधीज्ञ सभाग्रह बांधकामासाठी दोन कोटीचा निधी
मंजूर
-राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर,दि.3 (जिमाका)-
शासनाच्या
वैशिष्ट्ये पूर्ण योजनेअंतर्गत उदगीर येथे जंगम समाजासाठी आद्यगुरू रेणुकाचार्य सांस्कृतिक
भवन व उदगीर येथील न्यायालयीन परिसरात विधिज्ञ सभाग्रह बांधण्यासाठी शासनाने 02 कोटीचा
निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे
पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली
आहे.
उदगीर येथे जंगम समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला होता.
या मेळाव्यात उदगीर येथे जंगम समाजासाठी सभागृह उभे करण्यात येईल, असे आश्वासन दिले
होते. उदगीर शहराला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. शहराचा आपण पायाभूत विकास करीत
आहोत. यासोबत या शहराचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. शहरात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, लिंगायत
भवन, बुद्ध विहार, शादी खाना, रेड्डी भवन अशा विविध जाती-धर्माच्या नागरिकासाठी सभागृह
उभे करण्यात येत आहेत. यातून शहराचा सांस्कृतिक वारसा जपला जाणार आहे.
मागील अनेक दिवसापासून जंगम समाजासाठी उत्तम दर्जाचे व सर्व
सोयींनी युक्त असे सभागृह शहरात असावे अशी मागणी होती, यानुसार शासन स्तरावर याबाबत
मागणी करून त्याचा पाठपुरावा करुन शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 01 कोटी चा निधी
उपलब्ध करुन घेतला आहे यासोबतच उदगीर वकील मंडळाची न्यायालय परिसरात विधिज्ञ
सभागृह असावे अशी वकील मंडळीची मागणी होती त्यालाही शासनाने मंजुरी दिली आहे यासाठी
शासनाने 01 कोटी मंजूर केले आहेत
पुढील काळात या दोन्ही इमारती उत्तम दर्जाच्या व सर्व सोयी सुविधायुक्त
व पर्यावरण पूरक होतील असे सांगून या सभागृहास
पुढील काळात आणखी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. हे दोन्ही सभाग्रह उदगीरच्या वैभवात
आणखी भर घालतील असेही राज्यमंत्री संजय बनसोडे सांगितले.
0000
Comments
Post a Comment