जिल्ह्यातील पात्र कलावंताची निवड प्रत्यक्ष सादरीकरण घेवून होणार
जिल्ह्यातील पात्र कलावंताची निवड
प्रत्यक्ष सादरीकरण घेवून होणार
लातूर,दि.8 (जिमाका)-महाराष्ट्र
शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या मार्फत मान्यवर वृध्द साहित्यीक व कलावंतांना मानधन
ही योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील वृध्द साहित्यीक व कलावंत
यांना सन 2019-20 व 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडून
प्रस्ताव मागविण्यात आले होते.यानुसार प्राप्त प्रस्तावा मधून छाननी करुन पात्र कलावंतांचे
दिनांक 17,18 व 21 फेब्रुवारी 2022 या तीन दिवशी प्रत्यक्ष सादरीकरण घेवून निवड करण्याबाबतचा
निर्णय जिल्हास्तरीय वृध्द कलावंत निवड समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे लातूर
जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,
यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
पात्र कलावंत निवडीसाठी दि. 17 रोजी लातूर, चाकूर, अहमदपूर, दि. 18 रोजी
औसा, निलंगा, उदगीर तसेच दि. 21 रेाजी रेणापुर, देवणी, शिरुर अनंतपाळ, व जळकोट या तालुक्यातील
कलावंतानी यशवंतराव चव्हाण, सभागृह जि.प. लातूर येथे आवश्यक त्या मुळ प्रमाणपत्रासह
सकाळी 10.00 ते 06.00 या वेळेत उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन समितीकडून करण्यात येत
आहे.
या जिल्हास्तरीय बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी प्रभू जाधव, अध्यक्ष लालासाहेब देशमुख, डॉ. राम बोरगावकर, सदस्य विकास डगवाले,
सदस्य विवेक सौताडीकर, सदस्य विजयकुमार धायगुडे, सदस्य दिनकर निकम, सदस्य रमेश माळी
व सदस्य ही यावेळी बैठकीस उपस्थित होते.
0000
Comments
Post a Comment