इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश

 

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश

 

          लातूर,दि.11 (जिमाका):- सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात औरंगाबाद, जालना, बीड व लातूर या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुला / मुलींना इयत्ता 1 ली व 2 री मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

          या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत असावी. विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधीत छायांकित प्रत व दारिद्रय रेषा अनुक्रमांक नमुद करावा. पालकाची उत्पन्न मर्यादा ही 1 लाख एवढी असून यासाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात यावे. अर्जासोबत पालकांनी समंतीपत्रक देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, जन्म तारखेचा पुरावा व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे.

           या योजनेत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावेत. प्रकल्प कार्यालयात प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध्‍ असून दिनांक 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रवेश अर्ज जमा करणे आवश्यक आहे.

               या योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर होणारा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे. योजनेचा लाभ घेणेसाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, रिलायंन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर, औरंगाबाद येथे संपर्क साधावा. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यास शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश घेण्याबाबतचे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

0000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु