जिल्ह्यातील बँकानी पीक कर्ज प्रकरणी सकारात्मक काम करावे, विविध योजनांच्या कर्ज प्रकरणांचा जलद निपटारा करावा -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

 

जिल्ह्यातील बँकानी पीक कर्ज प्रकरणी सकारात्मक काम करावे,

विविध योजनांच्या कर्ज प्रकरणांचा जलद निपटारा करावा

                                        -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

लातूर दि.25 ( जिमाका ):-जिल्ह्यातील बँकांनी शासनाच्या विविध योजना, पीककर्ज प्रकरणा बाबतीत सकारात्मक काम करावे, काही बँकांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीक कर्ज आणि योजनांचे कर्ज प्रकरणे मंजूरी यात दिरंगाई दिसून येत आहे, ही नकारात्मकता थांबवून कर्ज प्रकरणांचा निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले.

नुकतीच तिमाही जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीमध्ये सर्व शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला व जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.  यांनी जिल्ह्यातील सर्व बँकाना मार्गदर्शन केले व शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सुचना केल्या.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अनंत कसबे, आरबीआयचे पियुष गोयल, विभागीय प्रबंधक क्षेत्रीय कार्यालय उस्मानाबाद विलास शिंदे, एसबीआयचे क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य प्रबंधक पंकजकुमार सिन्हा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. पडिले, जिल्हा उपनिबंधक सम्रत जाधव, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, नाबार्डचे श्री. गोखले, जिल्हा विकास प्रबंधक , आर से टी चे संचालक इबूतवार तसेच जिल्ह्यातील सर्व बँकाचे समन्वयक व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु