महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परिक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परिक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

 लातूर,दि.15(जिमाका):-महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2021 ही लातूर शहरातील विविध 30 उपकेंद्रावर दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी  सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी  विजयकुमार ढगे यांनी  फौजदारी प्रक्रियासंहिता 1973 चे कलम 144 अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त परीक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परिसरात पूढील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

केंद्राच्या परिसरात प्रवेश करते वेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राचे परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्ती कडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपे पर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्ती कडून परीक्षा सुरळीत पणे व शांततेच्या वातावरणा मध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेश मनाई राहील.

या अनुषंगाने परीक्षा केंद्राचे ठिकाण पूढील प्रमाणे आहेत. देशीकेंद्र विद्यालय,सिग्नल कँम्प लातूर, यशवंत विद्यालय, नांदेड रोड, लातूर, राजर्षी शाहू वाणिज्य महाविद्यालय, बस स्टँडसमोर, लातूर, दयानंद विज्ञान महाविद्यालय, बार्शी रोड, लातूर, दयानंद वाणिज्य महाविद्यालय आणि बीसीए, बार्शी रोड, लातूर, जिजामाता कन्या प्रशाला, नांदेड रोड, लातूर, परिमल विद्यालय नारायण नगर, लातूर, सरस्वती विद्यालय, खाडगांव रोड, प्रकाश नगर, लातूर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, दिलीप माने नगर, खाडगाव रिंगरोड, लातूर, श्री. शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, सरस्वती कॉलनी, लातूर, संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, अंबाजोगाई रोड, लातूर पहिला व दुसरा मजला, कॉकसीट सेंटर अ, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, अंबाजोगाई रोड, लातूर, दुसरा व तिसरा मजला कॉकसीट सेंटर ब गोदावरी लाहोटी कन्या विद्यालय, दयाराम रोड, लातूर एम.एस. बिडवे इंजिनिअरींग कॉलेज, बार्शी रोड, लातूर, ज्ञानेश्वर विद्यालय, शाहू चौक, नांदेड रोड, लातूर, महात्मा बसवेश्वर विज्ञान महाविद्यालय, लातूर, श्री.व्यंकटेश विद्यालय झिंगणाप्पा गल्ली, लातूर, श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, खाडगांव रोड, लातूर, दयानंद विधी महाविद्यालय, बार्शी रोड, लातूर,  श्री. रविशंकर विद्यामंदिर, खाडगांव रिंग रोड, लातूर, श्री. मारवाडी राजस्थान विद्यालय, सिग्नल कँम्प, लातूर,  पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन औसा रोड, लातूर,राजर्षी शाहू ज्युनिअर विज्ञान महाविद्यालय, बसवेश्वर चौक, लातूर, पार्ट-अ, राजर्षी शाहू ज्युनिअर विज्ञान महाविद्यालय, बसवेश्वर चौक, लातूर पार्ट-ब, दयानंद कला महाविद्यालय बार्शी रोड, लातूर, राजर्षी शाहू कला महाविद्यालय बस स्टँड समोर, लातूर, राजमाता जिजामाता ज्युनिअर कॉलेज, शिव नगर, सुतमिल रोड, लातूर, राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय बस स्टँड समोर, लातूर, जयक्रांती माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, सिताराम नगर, लातूर व केशवराज विद्यालय श्याम नगर, लातूर या उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी / कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे बाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत.

 

 

                                         0000

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा