मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज करावेत --- स्मार्टचे प्रकल्प संचालक धीरज कुमार

 

मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज करावेत

   --- स्मार्टचे प्रकल्प संचालक धीरज कुमार

लातूर दि.22 ( जिमाका ) :- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतंर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारित संस्थांकडून मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे पुणे स्मार्टचे प्रकल्प संचालक धीरज कुमार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

अर्ज हे शेतामाल, शेळ्या ( मांस व दुध ) आणि परसबागेतील कुक्कूटपालन ( अंडी ) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे.

या संदर्भातील माहिती अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इत्यादी माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट घ्यावी. त्यामध्ये माहिती भरुन व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक , आत्मा कार्यालयात, तसेच लोक संचलित साधन केंद्रानी जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एमएसआरएलएम यांच्या कार्यालयात ऑॅफलाईन दिनांक 31 मार्च, 2022 पर्यंत सादर करावेत. याअगोदर ऑनलाईन अर्ज केलेल्या संस्थांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा