कोविड-19 प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन लेखा व कोषागार दिन साजरा

 कोविड-19 प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन

लेखा व कोषागार दिन साजरा

           

लातूर, ( जिमाका ) 1:- कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी आज जिल्हा कोषागार कार्यालय, लातूर येथे कोविड -19 प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन कोषागार कार्यालयात मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी डी. एम. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व लेखा व कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्र येवून लेखा व कोषागार दिन साजरा करण्यात आला.
               जिल्हा कोषागार कार्यालयातील सहसंचालक श्री. डाके अप्पर कोषागार अधिकारी एस.जी.धुमाळे सेवानिवृत्त अपर कोषागार अधिकारी ए.के.भुसणे, लेखाधिकारी श्री. सगट, श्री. इटोलीकर, लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी तसेच महिला कर्मचारी आदिंची उपस्थिती होती.  
          ए.के.भुसणे यांनी सर्वाना अभ्यासपुर्ण काम करणे बाबत मार्गदर्शन केले, डॉ.  रत्नराज जवळगेकर यांनी शुभेच्छा देऊन संगणकीकरण व सचोटीने काम करण्याबाबत व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा जास्तीत-जास्त फायदा करुन घेण्याबाबत सर्व कोषागार परिवारातील अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
         

 तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन करुन त्यांचा यथोचित सत्कार केला. तत्पुर्वी. श्री. कुलकर्णी  यांनी अध्यक्षीय समारोप केला.  
          मागील वर्षात लेखा व कोषागार परिवारातील स्वर्गीय अधिकारी कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली व सरस्वतीपुजन आणि दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
          कार्यक्रमाचे सुत्र संचालन समाजकल्याण सहायक लेखाधिकारी डी.के.राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती एस.एस.उबाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी /महिला कर्मचारी यांनी योगदान दिले.
0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा