नेहरु युवा मंडळाला युवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 

नेहरु युवा मंडळाला युवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 

        लातूर,दि.10(जिमाका)- केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत नेहरु युवा केंद्र लातूर मार्फत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, स्वयंरोजगार पर्यावरण विकास, युवक विकास व राष्ट्रीय एकात्मता आदी क्षेत्रात वर्ष 2020-21 मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नेहरु युवा मंडळाला विशेष युवा मंडळ पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येते. या पुरस्कारासाठी  दिनांक 21 फेब्रुवारी 2022 पुर्वी अर्ज नेहरु युवा केंद्र लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत लातूर येथे दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांनी केले आहे.

           जिल्हास्तरावर पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या मंडळाला 25 हजार रुपये, राज्यपातळीवर पात्र ठरलेल्या मंडळाला रु. 75 हजार, राष्ट्रीय पातळीवर पात्र ठरलेल्या मंडळाला प्रथम रु. 3 लाख, व्दितीय रु. 1 लाख व तृतिय रु. 50 हजार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी 02382- 295598 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

                                                   0000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु