जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणूक अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

 

जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणूक अध्यक्ष पदासाठी

उमेदवारी अर्ज दाखल

 

लातूर,दि.3 (जिमाका)- जिल्ह्यता नुकत्याच झालेल्या नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूकीची नगर पंचायत शिरुर अनंतपाळ, चाकूर, देवणी व जळकोट अध्यक्ष पदासाठी भरलेले अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची माहिती पूढील प्रमाणे असल्याचे नगर प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी कळविले आहे.

यामध्ये शिरुर अनंतपाळ नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी उमेदवाराचे नाव 1) मायावती गणेश धुमाळे,  पक्षाचे नाव- भारतीय जनता पार्टी, 2) संभाले श्रीदेवी माधव, पक्षाचे नाव- नॅशनलीस्ट्र काँग्रेस पार्टी, 3) रागिनी सतीश शिवणे, पक्षाचे नाव- शिवसेना.

चाकूर नगर पंचायत  1) गुळवे आब्दुलकरिम रसुल, पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (दोन अर्ज) 2) माकणे कपिल गोविंदराव, पक्षाचे नाव - प्रहर जनशक्ती पक्ष, (दोन अर्ज)

देवणी नगर पंचायत  1) घोरपडे कीर्ती संजय, पक्षाचे नाव - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जळकोट नगर पंचायतीमध्ये अध्यक्ष पदासाठी 1) कांबळे प्रभावती चंद्रकांत, पक्षाचे नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यांचा समावेश आहे.

 

                                                  0000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु