शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी केलेल्या महिलांनाच प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ

 

शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी केलेल्या महिलांनाच

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ

       लातूर,दि.17(जिमाका):- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र शासनाची महत्वाकांशी  योजना आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मागील 730 दिवसापूर्वी (दोन वर्षामध्ये) अथवा तद्नंतर पहिल्यांदा गरोदर असणाऱ्या ज्या मातांची प्रसुती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाचे अधिसुचित केलेल्या शासकिय आरोग्य संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी पुढील प्रमाणे देण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद,लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

        या योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यांना एकुण रु. 5 हजार लाभ त्यांचे आधार संलग्न बँक खातेवर डिबीटीव्दारे देण्यात येतो. लाभ दयावयाचे एकुण 3 टप्पे असून पूढील प्रमाणे आहेत. 1 ला टप्पा :-  गरोदरपणाची लवकरात लवकर मासीक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात आपल्या जवळील एएनएम/ आशा यांच्याकडे नोंदणी केल्यानंतर  रु. 1 हजार देण्यात येत. 2 रा टप्पा :- किमान एकदा प्रसवपुर्व तपासणी शासकिय आरोग्य संस्थेत केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पुर्ण झाल्यांनंतर  रु. 2 हजार देण्यात येत. 3 रा टप्पा :-  प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकास 14 आठवडया पर्यंतचे प्राथमिक लसीकरण पुर्ण झाल्याचा दाखला मिळाल्यानंरत रु. 2 हजार देण्यात येत.

          लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :- लाभार्थी व त्यांच्या पतीचे आधार कार्ड, लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते, गरोदरपणाची शासकिय आरोग्य संस्थेत 150 दिवसांचे आत नोंद, शासकिय संस्थेत गरोदरपणा दरम्यान तपासणी , बाळाची जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण असावा.

        नोट :- शासकिय कर्मचारी असलेल्या व पगारी प्रसुती रजा घेणाऱ्या माताना या योजनेतंर्गत लाभ देता येणार नाही.

         सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षात लातूर जिल्ह्यासाठी एकूण वार्षिक उद्दिष्ठ 9 हजार 825 एवढे असून त्यापैकी 11 हजार 533 एवढया लाभार्थींना  एकूण रुपये 4 कोटी 61 लाख 25 हजार अनुदान थेट  DBT   व्दारे लाभार्थींच्या खात्यांत वर्ग करण्यात आले आहे.

       तसेच सन 2017 ते 2022 या वर्षाकरीता एकुण 56 हजार 613 एवढे वार्षिक उद्दिष्ठ असून त्यापैकी आतापर्यंत 58 हजार 210 एवढया लाभार्थींना एकूण रुपये 23 कोटी 27 लाख 7 हजार अनुदान थेट DBT व्दारे लाभार्थींच्या खात्यांत वर्ग करण्यात आले आहे.

         लातूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत लाभार्थी नोंदणी वाढविण्याकरीता जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रस्तरावर प्रत्येक महिन्यात गरोदर मातेची प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत आरोग्य तपासणी  शिबीरामध्ये पहिल्या खेपेच्या माताची तिथेच या योजनेतंर्गत नोंदणी फार्म भरुन घेतले जातात. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अंमलबजावणीत आशा कार्यकर्ती हे लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची नोंदणी करतात.

         ग्रामीण भागात योजनेचे काम वाढविण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका व आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, तालुका समुह संघटक, तालुका कार्यक्रम सहाय्यक हे वेळोवेळी आढावा बैठकीत मार्गदर्शन करतात. जिल्हास्तरावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी,  जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी , निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा समुह संघटक हे देखील वेळोवेळी सदर कार्यक्रमाचा आढावा बैठक घेऊन काम वाढविणेबाबत आवश्यक त्या सूचना, मार्गदर्शन व प्रोत्साहन देतात.

       लातूर जिल्ह्यातील सर्व लाभार्थींनी  त्यांनी त्यांच्या जवळच्या शासकिय संस्थेत अथवा आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य सेविका किंवा आशा कार्यकर्ती यांच्याकडे गर्भधारणा  राहील्यापासून 150 दिवसाच्या आत नोंद करावी असे ही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

                                                         000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु