रासायनिक विक्रेते यांच्या करीता अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार

 

रासायनिक विक्रेते यांच्या करीता

अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार

 

        लातूर,दि.17(जिमाका):- जिल्ह्यातील रासायनिक खत विक्रेते यांच्याकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनूसार मॅनेज, हैद्राबाद संस्थेच्या अधिपत्याखाली देसी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे प्रकल्प संचालक, आत्मा, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

       या अभ्यासक्रमासाठी सर छोटूराम कॉलेज ऑफ ॲग्री इंजिनिरींग ॲन्ड टेक्नालॉजी, लोदगा ता.औसा येथे 40 प्रशिक्षणार्थींच्या 2 बॅचेस तसेच प्राचार्य, कृषि महाविद्यालय, कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट,ता. लातूर येथे 40 प्रशिक्षणार्थींची 1 बॅच अशी एकूण 120 प्रशिक्षणार्थी ची सुविधा करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम फेब्रुवारी 2022 मध्ये सुरु करण्याचे नियोजन केलेले आहे.

         हा अभ्यासक्रम केंद्रशासनाने सर्व रासायनिक खत विक्रेते यांना बंधनकारक केलेला होता. परंतू उपनिर्देशक (कृषि विस्तार) महिनतेश शिरुर प्रधान समन्वय (देसी कोर्स) मॅनेज हैद्राबाद यांच्या पत्रान्वये नवोदीत लायसन्स काडू इच्छित प्रशिक्षणार्थी यांना रु. 20 हजार फिस भरुन या कार्ससाठी प्रवेश दिला जाईल. तेंव्हा सर्व इच्छूक परवानधारक / नॉन परवानधारक यांनी आपले नांव व इतर माहिती प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय, लातूर यांचेकउे नोंदवावीत.

       प्रत्येक रासायनिक खत विक्रेते व नवोदीत  प्रशिक्षणार्थी यांनी रु. 20 हजार पर्यंत फि भरुन आपले नाव नोंदवावे. तसेच खते, बियाणे व औषधांची परवाना झेरॉक्स कॉपी, प्रो. पा चे आधारकार्ड, शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्र व प्रकल्प संचालक आत्मा, लातूर यांचे नावे रु. 20 हजार डि.डी प्रकल्प संचालक आत्मा, लातूर कार्यालयास सादर करावा.

              अभ्यासक्रमाची फि दोन टप्प्यामध्ये भरता येईल नांव नोंदणीच्या वेळी रु. 10 हजार व अभ्यासक्रम सुरु झाल्यावर उर्वरीत रु. 10 हजार तरी इच्छूकांनी आपली नावे प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाकडे यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा, ङिएस. गावसाने यांनी केले आहे.

 

                                                         0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा