शासकीय अंधशाळेस राज्याचे दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांची भेट

 

शासकीय अंधशाळेस राज्याचे दिव्यांग आयुक्त

ओमप्रकाश देशमुख यांची भेट

 

       लातूर,दि.14(जिमाका):-  शहरातील लेबर कॉलनी परीसरात शासकीय अंधशाळा, लातूर येथे देशातील दुसरे सहाय्यक तंत्रज्ञान कक्ष तसेच दिव्यांगाकरीता सांस्कृतिक कला केंद्र उभारण्यात येत असून या केंद्राला राज्याचे दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी नुकतीच भेट देवून पाहणी केली.

       नवी दिल्लीच्या धर्तीवर राज्यात पहिला दृष्टीहिन बाधितांसाठी अद्यावत आधुनिक साहित्य सामुग्रीचा वापर करुन सहाय्यक तंत्रज्ञान कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे. आयुक्त्‍ यांच्या भेटीदरम्यान शाळेतील विशेष शिक्षक अमोल निलंगेकर यांनी महत्वाच्या तांत्रिक उपकरणांची माहिती देवून प्रात्यक्षिकासह सादर करुन दाखवले. यावेळी आयुक्त श्री. देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन पुढील काळात आवश्यक असलेल्या निधीची शासनाकडून पूर्तता करण्याबाबत अनुकुलता दाखविली.

         या वेळी पूर्ण दृष्टीबाधीत असलेले मराठवाडयातील पी.एच.डी. मिळविलेले पहिले अंध विशेष शिक्षक माधव गणपतराव गोरे, शिवाजी हास्कुल, लेबर कॉलनी, लातूर येथील कार्यरत यांचा विशेष सत्कार आयुक्त यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके देवून करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त, यांनी अंधत्वावर मात करुन वयाच्या 48 व्या वर्षी संशोधन केल्याबद्दल विशेष अभिनंदन केले तसेच या संशोधनाचा समाजातील सर्व स्तरातील अंध व दिव्यांग वर्गाला निश्चीत फायदेशीर ठरेल असे मत व्यक्त केले.

          यावेळी लातूर समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, अविनाश देवसटवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, शासकीय अंधशाळा प्रभारी अधिक्षक शाहुराज कांबळे यांच्यासह शाळेतील व जिल्हा परीषद समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 

                                                          0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा