जिल्ह्यात 27 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करा- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

जिल्ह्यात 27 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ

पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करा

-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

लातूर,दि.25 (जिमाका):- जगातून पोलिओचे निर्मुलन करणेसाठी सन 1995 पासून पल्स पोलिओ मोहिम राबविली जाते. यात नियमित लसीकरण, पोलिओ संक्षयीत  रुग्णांची तपासणी करणे व पल्स पोलिओ  मोहिम यशस्वीपणे राबविणे आवश्यक आहे.याच अनुषंगाने 27 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात सर्वत्र पल्स  पोलिओ मोहिम राबविली जाणार आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयाल यांनी पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

लातूर जिल्ह्यात 2 लाख 72 हजार 569 हे 0-5 वर्षे वयोगटातील लाभार्थी असून एकूण 2 हजार 128 बूथचे नियोजन केले आहे. यात 9 हजार 661 कर्मचारी यांची नियुक्ती केली असून 430 पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे. तालुकानिहाय जिल्हास्तरीय अधिकारी यांची नेमणूक करुन संनियंत्राची जबाबदारी दिली आहे.या मोहिमेत एकही लाभार्थी वंचीत राहू नये यासाठी नियोजन करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आहे. लातूर जिल्ह्यातील उसतोड ठिकाणी, विटभट्टया, स्थलांतरीत समुह, बांधकाम ठिकाणी लाभार्थी आगावू नोंदणी करुन सर्व सनियंत्रण अधिकारी यांनी व्यक्तीश:लक्ष देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सूचीत केले आहे.

 

                                     0000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु