19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त मद्य विक्री बंद

 

19 फेब्रुवारी  रोजी शिवजयंती निमित्त

मद्य विक्री बंद

                लातूर,दि.16(जिमाका):-लातूर जिल्ह्यात दिनांक 19 फेब्रुवारी 2022 या दिवशी शिवजयंती साजरा होत असल्याने या कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.लातूर यांनी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 च्या कलम 142 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी शिवजयंती निमित्त लातूर जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्य विक्री अबकारी अनुज्ञप्ती मद्यविक्रीस संपूर्णत:बंद राहतील, असे आदेशित केले आहेत.

       या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधीत अनुज्ञप्तीवर निलंबीत अथवा रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, आसेही आदेशात नमूद केले आहे.

                                                          0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा