महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयाची माहिती रेल्वेच्या डब्ब्यावर झळकली

 

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या लोककल्याणकारी

निर्णयाची माहिती रेल्वेच्या डब्ब्यावर झळकली

 

          लातूर,दि.11 (जिमाका):- राज्यातील महाविकास आघाडी 

सरकारने गेल्या दोन वर्षात राज्यात राबविलेल्या योजनांची माहिती भारतीय रेल्वेच्या डब्यांवर झळकली आहे. राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात घेतलेल्या लोककल्याणकारी योजनांची आणि निर्णयांची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून सर्वसामान्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने राज्याच्या विविध भागातून जाणाऱ्या पाच रेल्वे एक्सप्रेस गाडयांची निवड केली असून या मध्ये लातूर एक्सप्रेसचा समावेश करण्यात आलेला आहे.

             महाविकास आघाडी सरकारच्या योजनांच्या माहितीने सजलेली लातूर एक्सप्रेस लातूर येथे 9 फेब्रुवारी रोजी 6.37 वाजता रेल्वे स्थानकावर पोहचली. तेव्हा अनेक नागरिक रेल्वे डब्यांवरील या योजनांची माहिती स्फूर्तपणे वाचत असताना निर्दशनास येत होते.  

           राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात राज्यात राबविलेल्या विविध योजनांची माहिती रेल्वेच्या प्रत्येक डब्यांवर देण्यात आली आहे. या माहितीमध्ये  'आपला महाराष्ट्र, आपले सरकार' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. शेती, क्रीडा, सामाजिक न्याय, चिंतामुक्त शेतकरी, मोफत सातबारा, आता घरी येणार ई-पीक पाहणी नोंदणी, कोरोना लसीकरण, कोरोना काळातील आरोग्य विषयक कामकाज, नैसर्गिक आपत्तींच्या काळात राज्य सरकारने केलेली मदत, चक्रीवादळग्रस्त शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी केलेली मदत, कोरोना महामारीत पालक गमावलेल्यांना बालकांना केलेली मदत, जिथे सारथी तिथे प्रगती, क्षमता आणि कौशल्य वृध्दीसाठी शिक्षण प्रशिक्षण अशा अनेक योजनांची माहिती या रेल्वे डब्यांवर आकर्षकपणे लावण्यात आलेली आहे.

           यामध्ये, मराठवाडयातून धावणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस आणि लातूर एक्सप्रेसचा समावेश करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी ते 1 मार्च या दरम्यान रेल्वे डब्यांवर ही नागरिकांना दिसणार आहे.






0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा