जिल्हा माहिती कार्यालय व दयानंद कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिना दूरदृष्य प्रणालीव्दारे आयोजन

 

जिल्हा माहिती कार्यालय व दयानंद कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने

 

येत्या 27 फेब्रुवारी रोजी

मराठी भाषा गौरव दिना दूरदृष्य प्रणालीव्दारे आयोजन   

 

लातूर दि.25 ( जिमाका ):- मराठी भाषा गौरव दिन दिनानिमित्त  जिल्हा माहिती कार्यालय, लातूर व दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त  विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन येत्या दिनांक 27 फेब्रुवारी, 2022 रोजी दयानंद कला महाविद्यालयातील दयानंद सभागृह, लातूर येथे 11-00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे रमेश बियाणी, उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., प्राचार्य यशवंत पाटणेसातारा हे प्रमुख वक्ते म्हणून दूरदृष्य प्रणालीव्दारे बोलणार आहेत.

तसेच लातूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, प्रा. डॉ. सुनिता सांगोले, प्रा. डॉ. अंकुशकुमार चव्हाण, प्रा. डॉ. सुभाष कदम, उपप्राचार्य अनिलकुमार माळी , पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे आदि विविध प्रमुख मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहे. सदर कार्यक्रमाची लिंक सर्वांना उपलब्ध्‍ करुन देण्यात येईल.

0000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा