निरोगी व निकोप मन ,शरीर स्वास्थ्यसाठी खेळाच्या अशा स्पर्धा आवश्यक - राज्यमंत्री संजय बनसोडे
निरोगी
व निकोप मन ,शरीर स्वास्थ्यसाठी
खेळाच्या
अशा स्पर्धा आवश्यक
- राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर दि.27 ( जिमाका ):-आधुनिक जीवन शौली मुळे जीवनात ताणतणाव वाढले आहेत शरीर
व मन निकोप व निरोगी राहण्यासाठी अशा खेळांची आवश्यकता असते यातून जगण्याचा नवा दृष्टिकोन
मिळत असतो असे मत राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेच्या वतीने जिल्ह्यातील
डॉक्टर साठी विविध खेळाच्या स्पर्धाच्या उद्घाटन
प्रसंगी व्यक्त केले.
आधुनिक जीवन शैलीमुळे शारिरीक व मानसिक आरोग्यांच्या समस्या
निर्माण होत आहेत. मागील दोन वर्षापासुन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण
झाला. कोरोना काळात डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या यंत्रणेवर मोठा ताण होता.
यामुळे अशा खेळाच्या स्पर्धा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करित असतात
इंडियन मेडिकल कॉन्सिल, लातूर शाखेच्या वतीने लातूर येथील
ऑफिसर क्लब येथे डॉक्टर साठी विविध खेळांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. . यावेळी
इंडियन मेडिकल कॉन्सिलचे लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ.सुरेखा काळे, सचिव, डॉ हनुमंत किनीकर,
डॉ.मोहिनी गणू, डॉ.राजेश्वरी सावंत, डॉ. सुनील होळीकर, डॉ. जैतिन जैस्वाल इत्यादी उपस्थित
होते.
दोन वर्षापासून जागतिक महामारीचा सामना जग करीत आहे. या
काळात डॉक्टर व आरोग्य यंत्रणेने दिवसरात्र अतिशय उत्कृष्ट असे कार्य केले आहे. जीवाची
पर्वा न करता या मंडळीनी सेवा केली आहे. डॉक्टर
हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक असून यांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित
राहावे यासाठी अशा स्पर्धा आवश्यक आहेत. या काळातील आधुनिक जीवनशैली मुळे अनेक ताणतणावांना
या मंडळींना सामोरे जावे लागते. इंडियन मेडिकल कॉन्सिलचे हे अत्यंत उत्कृष्ठ उपक्रम
आहे. निकोप व निरोगी समाजव्यवस्थेसाठी अशा स्पर्धेची आवश्यकता असते असे मत राज्याचे
पर्यावरण व पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
0000
Comments
Post a Comment