जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभागांच्या संख्या निश्चीत करण्यासाठी कार्यक्रम घोषीत

 

जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी

प्रभागांच्या संख्या निश्चीत करण्यासाठी कार्यक्रम घोषीत

 

        लातूर,दि.24 (जिमाका):-  राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक 27 जानेवारी 2022 अन्वये माहे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या लातूर जिल्ह्यातील पूढील 361 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभांगांच्या सीमा निश्चीत करण्यासाठी कार्यक्रम घोषीत केलेला आहे.

          तालुका व ग्रामपंचायत संख्या पूढील प्रमाणे आहे.- लातूर तालुक्यातील -44, रेणापूर तालुक्यातील -37, औसा तालुक्यातील -60, निलंगा तालुक्यातील -68, शिरुर अनंतपाळ-15, देवणी तालुक्यातील-9, उदगीर तालुक्यातील-26, जळकोट तालुक्यातील-13, अहमदपूर तालुक्यातील-43 व चाकुर तालुक्यातील-46 असे एकूण 361 ग्रामपंचायतींची संख्या आहे.

           प्रभाग रचना कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचनेला (नमुना-ब) संबंधीत तालुक्याचे तहसिलदार यांचेमार्फत दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिध्दी देवून हरकती मागविण्यात येणार आहेत. या 361 ग्रामपंचायतींच्या प्रारुप प्रभाग रचनेस हरकती दिनांक 25 फेब्रुवारी 2022 ते 4 मार्च 2022 या कालावधीत संबंधीत तालुक्याचे तहसिल कार्यालयामध्ये सादर करता येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु