रेणापूर ते पानगाव मोड सिमेंट मार्गाला तडे, पालकमंत्री यांच्याकडून तातडीने दखल ; प्रशासनाला दिले खुलासा मागविण्याचे आदेश
रेणापूर ते पानगाव मोड सिमेंट
मार्गाला तडे, पालकमंत्री यांच्याकडून तातडीने दखल ; प्रशासनाला दिले खुलासा मागविण्याचे
आदेश
लातूर,दि.3 (जिमाका)- राज्यमार्ग
168 रेणापूर ते पानगाव मोड या सिमेंट मार्गावर तडे गेल्याची बातमी आल्यानंतर पालकमंत्री
अमित देशमुख यांनी तात्काळ दखल घेतली. प्रशासनाला संबंधित एजन्सी कडून खुलासा मागवावा
असे आदेश दिले.
आज तात्काळ जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
यांनी संबंधित एजन्सीला पत्र पाठवून आपल्याकडून ज्या रेणापूर - पानगाव मार्गाचे काम
झाले आहे. त्या मार्गावर मोठया प्रमाणावर तडे गेलेले आहेत, अशा आशयाच्या बातम्या जिल्ह्यातील
वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रसिध्द झाल्या आहेत.याची दखल पालकमंत्री अमित देशमुख यांनीही
घेतली असून या बाबतचा खुलासा तात्काळ करावा असे पत्र पाठवले असल्याची माहिती जिल्हा
प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
0000
Comments
Post a Comment