बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन
बाळासाहेब ठाकरे
कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत
ऑफलाईन पध्दतीने
अर्ज करण्याचे आवाहन
लातूर,दि.18,(जिमाका)
:- बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन
(स्मार्ट) प्रकल्पांतर्गत लातूर जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्थाकडून मुल्यसाखळी
विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज
मागविण्यात येत आहेत.
सदर अर्ज हे शेतमाल, शेळया (मांस व दुग्ध) आणि परसबागेतील किक्कुटपालन (अंडी) यांच्या
मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पासाठी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय
अधारित संस्थामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानंतर्गत स्थापीत प्रभाग संघ, महिला आर्थीक विकास महामंडळाद्वारे स्थापीत लोकसंचलित साधन केंद्र
यांचा समावेश आहे.
अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती http://www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून
डाऊनलोड करून प्रिंट घ्यावी, त्यामध्ये माहिती भरून व
आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रकल्प
संचालक आत्मा कार्यालयात, तसेच लोकसंचलित साधन केंद्रांनी
जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा
अभियान व्यवस्थापक, एमएसआरएएलएम यांच्या कार्यालयात
ऑफलाईन दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावेत. या आगोदर ऑनलाईन अर्ज केलेल्या
संस्थांनी पुनश्च: अर्ज करण्याची आवश्यकता नाही असे अवाहन प्रकल्प संचालक आत्मा, लातूर डी.एस.गावसाने यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment