महा-शरद पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करावी

                                     महा-शरद पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करावी

*लातूर दि.22 ( जिमाका ) :-* दिव्यांग व्यक्तींना त्यांचे जीवन सुगम्यतायुक्त जगणे सुलभ व्हावे, यासाठी दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थ्यांसाठी शासनाने महा शरद पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलद्वारे शासनाच्या मंच्यावर दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यक उपकरणे उपलब्ध होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक  असल्याने  समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी केले आहे.

या पोर्टलवर सामाजिक दानशूर व्यक्ती, सामजिक संस्था, कंपन्या यांना तसेच देणगी देवू इच्छिणाऱ्या वर्गणीदारांना एकत्र आणून वर्गणीदारांचे सहकार्य पोर्टलद्वारे मिळविण्यात येत आहे. पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांगांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास मंडळाच्या योजनांची माहिती देणे, विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगांची परिस्थिती व गरजा समजून घेणे. दिव्यांग व्यक्ती, अशासकीय संघटना, समाज सेवक आणि देणगीदार यांना एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय 11 डिसेंबर, 2020 अन्वये महा-शरद अंतर्गत अभियान दिव्यांग कल्याण आयुक्ताल, पुणे व महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, पुणे यांच्यामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येत आहे.

याकरिता विद्यार्थी , दिव्यांग व्यक्ती तसेच दिव्यांग सहाय्य करु इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटठनांची नोंदणी www.mahasharad.in या संकेतस्थळावर करणे गरजेचे आहे. याकरिता दिव्यांग व्यक्तींकडे वैश्विक ओळखपत्र ( UDID card ) असणे आवश्यक आहे.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु