जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणासाठी विशेष मोहिम

 

जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील

        प्रलंबित प्रकरणासाठी विशेष मोहिम

 

लातूर,दि.3(जिमाका)-महाराष्ट्रातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांची संख्या पाहता शासनाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी दिनांक 1 फेब्रुवारी 2022 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याचे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

या विशेष मोहिमेतंर्गत लातूर जात पडताळणी समितीकडे माहे-डिसेंबर 2021 अखेर शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर विषयक जाती दावा पडताळणीच्या प्राप्त झालेल्या ऑनलाईन व ऑफलाईन अशा प्रकरणामध्ये ज्या प्रकरणात समितीने तपासणी केल्यानंतर कागदपत्रात पुराव्याअभावी त्रुटी आढळून आलेल्या आहेत, अशा सर्व प्रलंबित प्रकरणामध्ये संबंधित अर्जदार यांना त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेशाव्दारे (SMS) तसेच त्यांच्या Email ID वर Email व्दारे त्रुटी पुर्तता करणेबाबत संबंधित अर्जदारांना ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने कळविण्यात आलेले आहे.

माहे- डिसेंबर, 2021 अखेर प्रलंबित असलेल्या ज्या प्रकरणामध्ये अर्जदाराने त्रुटीची पुर्तता केलेली नाही अशा प्रकरणामध्ये अर्जदार यांना कागदपत्र त्रुटीची पुर्तता करण्याकरीता दिनांक 1 फेब्रुवारी 2022 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. ज्या अर्जदारांकडून या कालावधीत कागदपत्रांची पुर्तता न झाल्यास त्यांची प्रकरणे बंद करण्यात येतील व त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल, याची नोंद घ्यावी असे ही प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा