प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम शेतकरी सहल शेतकऱ्यांनी 6 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावेत

 

प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम शेतकरी सहल

शेतकऱ्यांनी 6 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावेत

 

लातूर,दि.3 (जिमाका)- एकात्मीक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-2022 मनुष्य बळ विकास कार्यक्रम अंतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम शेतकरी सहल दिनांक 8 फेब्रुवारी 2022  ते 12 फेब्रूवारी 2022 या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. तरी पुढील अटीच्या अधीन राहून तालुका कृषि अधिकारी उदगीर, चाकूर, देवणी, अहमदपूर व जळकोट या तालुक्यातील शेतकऱ्यांनी 6 फेब्रुवारी 2022 पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे रीतसर अर्ज सादर करावेत असे उपविभागीय कृषि अधिकारी उदगीर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

यासाठी अटी पूढील प्रमाणे आहेत :-  शेतकरी फळबाग लागवड / कांदा चाळ / सुरक्षित शेती / प्राथमिक प्रक्रिया ई योजनेचा लाभ्‍ घेतलेले शेतकरी व ईछीत शेतकरी असावा. महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्ज शेतकरी, लक्षांकापेक्षा मर्यादेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. महिला / अनु.जाती / अनु जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल व यासाठी कोविड-19 च्या लसीचे दोन्ही लसीकरण झालेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.

                                                0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु