“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

पंडीत दीनदयाल उपाध्याय

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

                लातूर,दि.10(जिमाका)- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर यांचे मार्फत  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे  दिनांक 14 ते 21 फेब्रूवारी 2022 रोजी पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यासाठी जिल्हयातील नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आयोजन केले असल्याचे सहायक आयुक्त बा.सु. मरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

          या मेळाव्यात रोजगार देणारी   PIAGGIO VEHICLES Pvt.Ltd. PUNE मध्ये एकूण 100 जागा, पात्रता ITI, PRATHAM EDUCATION FOUNDATION KILLARI LATUR  मध्ये 100 जागा, पात्रता SSC/ITI, YASHASWI GROUP CHINCHWAD PUNE मध्ये एकूण जागा 100 पात्रता SSC/HSC/ANY ITI/DIPLOMA/BE, LIC of INDIA LATUR, मध्ये एकूण जागा  100 पात्रता SSC या नामांकित कंपनीत/आस्थापनांकडून एकूण 400 रिक्त पदे हे  Mahaswayam.gov.in   या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने अधिसुचित करण्यात आली आहेत.

             यासाठी वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी रिक्त पदांसाठी अर्ज करावेत. तसेच अर्ज केलेल्या उमेदवारांच्या व्हिडिओ क्रॉन्फरंन्स, व्हॉस्टअप, स्काईप, किंवा दुरध्वनीद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी Mahaswayam.gov.in   या  वेबपोर्टलला लॉगीन करावे. नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांनी अद्याप पर्यंत नोंदणी केलेली नसल्यास  वरिल संकेतस्थळावरून किंवा ॲड्रॉईड मोबाईल धारकांनी प्लेस्टोअर मधून Mahaswayam हे ॲप डाउनलोड करून नोंदणी करावी. तसेच लॉगीन करून उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावेत.

         या कार्यालयाने उमेदवारांनी जास्तीत जास्त आपला सहभाग नोंदविण्यासाठी QR Code Scan   करून ही आपला सहभाग नोंदविता येईल. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर कार्यालयाच्या 02382 - 299462 या क्रमांकावर संपर्क साधावा . या मेळाव्याचा जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा असे अवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा