राष्ट्रीय मतदार जागृती करण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन
राष्ट्रीय मतदार जागृती करण्यासाठी
विविध स्पर्धाचे आयोजन
लातूर,दि.17(जिमाका):-भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2022 ते 15 मार्च 2022 या कालावधीत राष्ट्रीय
मतदार जागृती स्पर्धाच्या अंतर्गत् प्रश्न मंजुषा स्पर्धा, व्हिडीओ तयार करण्याची
स्पर्धा, पोस्टरची डिझाईन करण्याची स्पर्धा, गाण्याची स्पर्धा व घोषवाक्य (SIogan) तयार करण्याची स्पर्धा आयोजित केल्या आहेत असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, लातूर
यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
या स्पर्धेची सविस्तर माहिती https//ecisveep.nic.in/contest/ येथे उपलब्ध् आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक स्पर्धकांनी
भाग घ्यावा या करिता संबंधित मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहाय्यक
मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांनी पुढील प्रमाणे प्रचार व प्रसिध्दी करण्यात
यावी. या स्पर्धेचे पोस्टर, गाईडलाईन्स, व्हिडीओ याची स्थानिक वृत्तपत्र, समाज माध्यम,
विविध व्हाट्सॲप / टेलिग्राम ग्रुपवर प्रचार व प्रसिध्दी करावी. या स्पर्धेची माहिती
मतदार केंद्र स्तरीय अधिकारी, NSS,NYK,NCC,
Media Houses व इतर संबंधित व्हट्सॲप / टेलिग्राम ग्रुप वर र्स्धेच्या कालावधीत नियमितपणे
पाठविण्यात यावी. समाज माध्यमांवर माहिती अपलोड करतेवेळी हॅशटंग #PowerOfOne Vote याचा वापर करण्यात
यावा.
जिल्ह्यातील
विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा यांच्या प्रशासनाला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत
सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे.या शैक्षणिक संस्थांना स्पर्धेतील पोस्टर
त्यांच्या नोटीस बोर्डवर लावण्यासाठी आणि व्हट्सअूप / ई-मेल व्दारे विद्यार्थ्यांमध्ये
प्रसारीत करण्यात यावी. उद्योग, कॉर्पोरेट
संस्था, बँक, पोस्ट ऑफिस, रेल्वे व इतर शासकीय विभाग, मतदार जागृती मंच यांच्यामध्ये
या स्पर्धेचे गाईड लाईन व पोस्टर याचा प्रसार व्यापक प्रमाणात करण्यात यावा.
000
Comments
Post a Comment