वांजरवाडा ,हवरगा, चेरा यांच्यासह जळकोट तालुक्यातील पाच गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली
वांजरवाडा ,हवरगा, चेरा यांच्यासह जळकोट तालुक्यातील
पाच गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली
*पाणीपुरवठा योजनेसाठी 20 कोटी निधी मंजूर
- राज्यमंत्री संजय बनसोडे
शासनाच्या
जल जीवन मिशन अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार असून या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र
जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या योजनेतून प्रत्येक घरास नळजोडणी देणे
आवश्यक आहे, नवीन जोडणी बाबत आवश्यक ते नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असणार
आहे.
जल जीवन
मिशन कार्यक्रमांतर्गत ही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जळकोट येथील या ८ गावाचा नळ
पाणी पुरवठा योजनेचा दरडोई खर्च हा विहीत निकषामध्ये असल्यामुळे व सदर योजनेची ढोबळ
किंमत रु. ५.०० कोटी पेक्षा जास्त असल्याने नळ पाणी पुरवठा योजनेस मंजूरी देण्यासाठीचा
प्रस्ताव शासनाच्या मान्यतेकरीता सादर करण्यात आला होता त्यास मंजुरी देण्यात आली.
जळकोट तालुक्यातील
या आठ गावांसाठी ही योजना मंजूर झाल्यामुळे गावातील अनेक वर्षाचा पाणी प्रश्न निकाली
निघाला आहे. ग्रामीण भागामध्ये शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने जल जीवन
मिशन अंतर्गत प्रत्येक घराला प्रतिव्यक्ती 55 लिटर प्रमाणे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात
येणार आहे. या योजनेचा फायदा या गावातील जवळपास दोन लाख नागरिकांना होणार असून ही योजना
त्वरित कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण व पाणीपुरवठा
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
0000
Comments
Post a Comment