बाजरा न्युट्रीफीड वैरणीचे शंभर टक्के अनुदान बियाणेसाठी अर्ज करावेत

 

बाजरा न्युट्रीफीड वैरणीचे शंभर टक्के

अनुदान बियाणेसाठी अर्ज करावेत

 

                लातूर,दि.16(जिमाका):- सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी दुभत्या जनावरांना खादय उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत (सर्व साधारण योजना) संकरीत बाजरा न्युट्रीफीड वैरणीचे 100 टक्के अनुदानावर बियाणे पशुसंवर्धन विभाग  लातूर जिल्हा परीषदे कडून वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 10 ही तालुक्यातून या योजनेसाठी अर्जदाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि) पं.स/ किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपलब्ध करुन घ्यावेत.

       पुर्णपणे भरलेले विहित नमुण्यातील अर्ज दिनांक 17 2022 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात जमा करावेत. लाभार्थीची निवड पात्र अर्जामधून सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 मार्च 2022 नंतर प्राप्त होणाऱ्या किंवा अपुर्ण अर्जाच्या  निवडीच्या सोडतीसाठी विचार केला जाणार नाही. तरी जास्तीत जास्त संख्येने लातूर जिल्ह्यातील सर्व जातीच्या व्यक्तींनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.डी. पडीले यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                           0000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु