युक्रेन येथे युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक तिथे अडकले असल्यास त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचे आवाहन
युक्रेन येथे युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
जिल्ह्यातील
नागरिक तिथे अडकले असल्यास
त्यांची
माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी
-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचे आवाहन
लातूर,दि.24
(जिमाका):-युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य
शासनाने भारतातून युक्रेनमध्ये कामासाठी किंवा शिक्षणासाठी गेलेल्या व सध्या निर्माण
झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथे अडकलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्याच्या
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सुचना केल्या आहेत.
तरी आपल्या तालुक्यातून / पोलीस स्टेशन हद्दीतून /
लातूर शहर महानगरपालीका क्षेत्रातून युक्रेनला गेलेल्या व्यक्तींची माहिती पोलीस स्टेशन
/ पर्यटकाचे नातेवाईक / तलाठी / मंडळ अधिकारी / ग्रामसेवक यांच्याकडून संकलित करून
विहित नमुन्यात या कार्यालयास यथाशीघ्र ई-मेल ddmolatur@gmail.com या ई-मेल पत्यावर
पाठविण्यात यावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आवाहनही केले आहे.
0000
Comments
Post a Comment