पशुसंवर्धन विभागामार्फत 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान वराह पालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

 

पशुसंवर्धन विभागामार्फत 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान

वराह पालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

 

लातूर,दि.21,(जिमाका):- पशुसंवर्धन विभाग, लातूर, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, वराह पालन संबंधी राष्ट्रीय संशोधन संस्था गोहत्ती आसाम आणि जनाधार संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 ते 26 फेब्रुवारी 2022 दरम्यान लातूर येथे वराह पालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले असल्याचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त लातूर विभाग लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

लातूर महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम जन-आधार सेवाभावी संस्था मागील 20 वर्षापासून करीत आहे. संस्थेने सन 2021 पासून वराह पालनाचे प्रक्षेत्र सुरु केले असून त्यामध्ये सध्या 175 प्राणी संवर्धन केले जात आहे. या प्राण्यांच्या आहाराची अंशता:व्यवस्था हॉटेल / मंगलकार्यालयातून उपलब्ध्‍ होणाऱ्या किचनवेस्ट मधून केली जाते. जनाधार संस्थेकडे व्यवस्थापणाशी संबंधीत असलेले 55-60 कामगार / कार्यकर्त्यांना वराह पालनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळणे बाबत संस्थेन विनंती केली होती.

स्वंयरोजगार प्रशिक्षण अंतर्गत पशुसंवर्धन विषयक शासकीय प्रशिक्षण संस्था, मुरुड ता.जि. लातूर यांचे मार्फत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. वराह पालनाचे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्यांनी डॉ. योगेश बायस, (मो.नं.8888150027) पशुधन विकास अधिकारी, कुक्कुट प्रशिक्षण केंद्र, मुरुड ता.जि. लातूर यांचेशी संपर्क साधावा.

या अनुषंगाने प्रशिक्षण वर्गासाठी डॉ.हेमंत बिराडे, माजी प्राचार्य पशुवैद्यकीय व विज्ञार संस्था, अकोला यांना साधन व्यक्ती म्हणून व्याख्यांनासाठी समन्वयक आहेत. भारतातील व्यवसायीक वराह पालन स्थिती, वराहपालनाचे सुत्र, वराह प्रजाती व पैदास व्यवस्थापन, वराह आहार व्यवस्थापन, वराहातील प्रमुख रोग व आरोग्य व्यवास्थापन, मांस मुल्यवर्धन तंत्र, मार्केटींग या महत्वाच्या विषयांचा समावेश आहे.

 

                                                0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु