भूकंपाला नियंत्रण करणं आपल्या हाती नाही पण भूकंपरोधक घरं बांधणे आपल्या हाती - मराठी भाषा केंद्र सरकारचे सचिव,प्रवीणसिंह परदेशी
भूकंपाला नियंत्रण करणं आपल्या हाती नाही पण भूकंपरोधक घरं बांधणे आपल्या हाती - मराठी भाषा केंद्र सरकारचे सचिव,प्रवीणसिंह परदेशी लातूर दि.30(जिमाका) :- भूकंपाला नियंत्रण करणं आपल्या हातात नाही, परंतु यापासून बचाव करण्यासाठी मात्र प्रयत्न करु शकतो. त्यासाठी योग्य प्रशिक्षण तसेच आपण बांधत असलेले घरे, इमारती भूकंपरोधक बांधणे आवश्यक असल्याचे मराठी भाषा केंद्र सरकारचे सचिव तथा लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले. औसा व निलंगा तालुक्यातील भूकंपग्रस्त अ व ब वर्गवारीच्या गावातील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी व त्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आवश्यक कार्यवाही आणि उपाययोजना करण्यासाठी किल्लारी येथील निळकंठेश्वर देवस्थान, सभागृहात मराठी भाषा केंद्र सरकारचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत भूकंप पुनर्वसित अ व ब वर्गवारीच्या गावातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात समाधान शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावे...