सेवा कर्तव्यपथ पंधरवडा" निमित्त तृतीयपंथीयांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देणे बाबत शिबीराचे आयोजन
सेवा
कर्तव्यपथ पंधरवडा" निमित्त तृतीयपंथीयांची नोंदणी करुन त्यांना
ओळखपत्र व प्रमाणपत्र देणे बाबत शिबीराचे
आयोजन
*लातूर,दि.30(जिमाका):-* सामाजिक
न्याय विभागामार्फत दि. 17 सप्टेंबर,2022 ते 2 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये सेवा
कर्तव्यपथ पंधरवडा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त
राज्यातील तृतीयपंथीयांना या सेवा पंधरवाडा कालावधीमध्ये तृतीयपंथीयांची नोंदणी करून
त्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी या क्षेत्रात काम करणा-या स्वंयसेवी
संस्थांच्या सहाय्याने दि. 17 सप्टेंबर,2022 ते 2 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये विशेष
शिबीराचे आयोजन करणे बाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत.
आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र
राज्य, पुणे डॉ. प्रशांत नारनवरे, यांच्या मार्गदर्शनातून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,
लातूर या कार्यालयामार्फत व एकता बहुउद्देशिय महिला मंडळ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने
दि. 29 सप्टेंबर, 2022 रोजी लातूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची नोंदणी करुन त्यांना
ओळखपत्र व प्रमाणपत्र देणेसाठी तसेच आरोग्य विषयक व कायदेविषयक मार्गदर्शन करणेसाठी
सामाजिक न्याय भवन लातूर येथे एकदिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर एकदिवशीय शिबीरामध्ये तृतीयपंथीयांची
नोंदणी केलेल्या दोन तृतीयपंथीयांना अध्यक्ष यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटप
करण्यात आले. तसेच अॅड. शेलरत्न शिरसट (विधिज्ञ मंडळ लातूर) यांनी तृतीयपंथीयांना कायदेविषयक
सविस्तर मार्गदर्शन केले तर दयानंद पाटील (API) यांनी तृतीयपंथीयांना भेडसावणा-या समस्या
व त्यावरील उपाय या बाबत मार्गदर्शन केले. तसेच बीपीन बोर्डे जिल्हा एड्स नियंत्रण
व प्रतिबंध विभाग (DS) यांनी तृतीयपंथीयांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. तर प्रिती
माऊली लातूरकर (तृतीयपंथी गुरु लातूर) यांनी तृतीयपंथीयांना रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या
समस्यांविषयी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे शेवटी अध्यक्षस्थानी असलेले प्रादेशिक
उपायुक्त समाज कल्याणचे अविनाश देवसटवार लातूर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रादेशिक
उपायुक्त, समाज कल्याण विभाग लातूरचे अविनाश देवसटवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणेजिल्हा
एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग डिस्ट्रक सुपर व्हायजर लातूर बीपीन बोर्डे, तृतीयपंथी गुरु श्रीमती प्रिती माऊली ॲड.शैलरत्न
शिरसट (विधिज्ञ मंडळ लातूर), सहायक पोलीस निरिक्षक लातूर दयानंद पाटील व अध्यक्ष एकता
बहुउद्देशिय महिला मंडळ, लातूर श्रीमती मनिषा होलकुंदे हे उपस्थित होते.तसेच समाज कल्याण
निरिक्षक एस.के. घुगे, तालुका समन्वयक शिंदे श्रीराम व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
कार्यालातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक श्रीराम
शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन एकता बहुउद्देशिय महिला मंडळ श्रीमती अनिता निकते
यांनी केले.
000
Comments
Post a Comment