जिल्हाधिकाऱ्यांनी हासुरी गावास (ता. निलंगा ) दिली भेट ;

नागरिकांनी घाबरू नये केले आवाहन

        लातूर दि.13 (जिमाका)  हासुरी गावातील नागरिकांनी घाबरू नये. भूकंप मापन केंद्रात भूकंपाची नोंद झाली नाही. पण गावात  भुगर्भातून आवाज येत आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने भारतीय भु-विज्ञान संस्था नागपूर आणि भारतीय हवामान खात्याचे भूकंप शास्त्र विभाग नवी दिल्ली यांच्याशी संपर्क साधून हासुरी गावात भेट देण्याची विनंती केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आज गावाकऱ्यांच्या समोर दिली.

            निलंगा तालुक्यातील हासोरी या गावात मागील सहा तारखेपासून भूकंप सदृश्य आवाज व धक्के जाणवत असल्याबाबत नागरिकांनी महिती दिली होती. यासंदर्भात दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रभारी अधिकारी भूकंप वेधशाळा हवामानशास्त्र विभाग लातूर आणि वरिष्ठ व वैज्ञानिक पूजन सर्वेक्षण विभाग लातूर यांनी असुरी गावात भेट देऊन पाहणी केली होती. भारतीय हवामान खात्याचे भूकंप वेध शाळा लातूर येथे भूकंपाची नोंद झाली नव्हती. यासंदर्भात अतिरिक्त अभ्यास होण्याची आवश्यकता असल्याबाबत शास्त्रज्ञांची म्हणणे आहे, त्याकरिता भारतीय भु-विज्ञान संस्था नागपूर आणि भारतीय हवामान खात्याचे भूकंप शास्त्र विभाग नवी दिल्ली यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पत्रव्यवहार करण्यात येऊन त्यांच्या तज्ञांचे पथक हासोरी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे भेट देण्याची विनंती करण्यात आली आहे. नागरिकांनी  घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव,तहसीलदार सुरेश घोडवे, वरिष्ठ व वैज्ञानिक एस बी गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, सहाय्यक भूवैज्ञानिक जिल्हा परिषद लातूर श्री प्रदीप नागरगोजे, श्री. येलाले, गटविकास अधिकारी निलंगा व ईतर तालुका स्तरीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन नियोजन

              यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.यांनी गावाचा आपत्ती गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून त्या आराखड्याच्या माध्यमातून विविध पथके स्थापन करणे, पथकांना प्रशिक्षण देणे त्याचबरोबर सुरक्षित स्थानांची निश्चिती करणे, धोकादायक इमारती, धोकादायक स्थळ पाहणी करणे बाबत सूचना केल्या. उद्या दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील भूगर्भशास्त्र विभागातील तज्ञ प्राध्यापकांचे एक पथक निलंगा येथील हासोरी गावात भेट देणार असल्याचेही जिल्हाधिकारी यावेळी सांगितले. तसेच भारतीय हवामान खाते नवी दिल्ली येथील भूकंपशास्त्र विभागातील तज्ञ वैज्ञानिकांचेही पथक लवकरच हासोरी गावात भेट देण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी यावेळी नमूद केले. गावकऱ्यांनी घाबरू नये प्रशासन व शासन आपल्या सोबत असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी गावकऱ्यांना सुचित केले.

 





                                                        0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा