औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ- मतदार नोंदणी मतदार यादी नव्याने (de-novo) तयार करण्याचा कार्यक्रम

 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ- मतदार नोंदणी

मतदार यादी नव्याने (de-novo) तयार करण्याचा कार्यक्रम

         *लातूर,दि.30(जिमाका):-*मा.भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार दि. 1 नोव्हेंबर, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने (de-novo) तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार दि. 1 ऑक्टोबर, 2022 रोजी जाहिर सूचना प्रसिध्द करण्यात येणार असून नाव नोंदणीसाठीचा अर्ज नमुना-19 व्दारे दावे व हरकती दि. 1 ऑक्टोबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.

           तसेच दि. 23 नोव्हेंबर, 2022 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर दि.23 नोव्हेंबर, 2022 ते दि. 9 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. सदर दावे व हरकती निकाली काढून अंतिम मतदार यादी दि. 30 डिसेंबर, 2022 रोजी प्रसिध्द होणार आहे.

          लोकप्रतिनिधित्व अधिनियम-1950 चे नियम-27 (3) (ब) खाली राज्य शासनाने निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शाळांमध्ये दि. 1 नोव्हेंबर,2022 या अर्हता दिनांकापुर्वीच्या लगतच्या सहा वर्षामध्ये किमान 3 वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येईल. याकरीता नमुना-19 अर्ज परिपूर्ण भरुन त्यासोबत विहित नमुन्यातील संबंधित शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने दिलेले प्रमाणपत्र भरावे लागेल. सदर नमुना-19 व विहितप्रमाण पत्राचा नमुना मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अनुक्रमे, Downloads/Download Forms/Form-19.pdf व Downloads/Download Forms/Certificate Form-19.pdf येथे सुध्दा उपलब्ध आहेत.

           त्यानुसार लातूर जिल्ह्यातील दि. 1 नोव्हेंबर, 2022 या अर्हता दिनांकास विहित निकषानुसार पात्र शिक्षक यांनी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने (de-novo) तयार करणे या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात वरील प्रमाणे विहित कालावधीत नमुना-19 अर्ज (विहित नमुन्यातील संबंधित शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने दिलेले प्रमाणपत्रासह) परिपूर्ण भरुन ईतर आवश्यक कागदपत्रासह आपले योग्यरीत्या भरलेले अर्ज सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांचे कार्यालयात जमा करुन आपले नाव शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                            0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा