स्टँडअप इंडिया योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना
स्टँडअप इंडिया योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द*
*समाजाच्या घटकांसाठी
मार्जिन मनी योजना*
*लातूर
दि.5(जिमाका)* सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभागाच्या शासन निर्णय दिनांक
8 मार्च 2019 अन्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द
समाजाच्या घटकांकरीता मर्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे.
सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन
दिनांक 9 डिसेंबर 2020 अन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यता आलेले आहेत. सदरचा शासन
निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.gov.in या संकेत स्थळावर
निरीक्षणासाठी उपलब्ध् आहे.
सदर योजनेकरीता नवउद्योजक इच्छुक लाभार्थींनी
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय लातूर यांचेकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात
आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव दिनांक 12 सप्टेंबर 2022 पूर्वी
सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,लातूर यांचे कार्यालयात सादर करावे असे आवाहन सहायक
आयुक्त समाज कल्याण एस.एन. चिकुर्ते यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
0000
Comments
Post a Comment