अधिकारी,कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज बिनचूक व जलद पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणाचा वापर करावा - मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल
अधिकारी,कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज
बिनचूक व जलद पूर्ण करण्यासाठी
प्रशिक्षणाचा वापर करावा - मुख्य कार्यकारी
अधिकारी अभिनव गोयल
*लातूर,दि.24(जिमाका):-*
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज बिनचूक व जलद पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणाचा
वापर करावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
जिल्हा परिषद लातूर जिल्हा मुख्यालयीन लिपीकवर्गीय सहा. प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन
अधिकारी, विस्तार अधिकारी (सा.), वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक कर्मचाऱ्यांचे नुकतेच
(दिनांक २३ सप्टेंबर, २०२२) रोजी सकाळी १०.००
ते ६.०० एक दिवसीय क्षमतावृद्धी प्रशिक्षण शिबीर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, लातूर
येथील प्रशिक्षण सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अभिनव गोयल यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.)
नितीन दाताळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर, कार्यकारी अभियंता (ल.पा.)
शेलार, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीम. वंदना फुटाने व इतर विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
प्रशिक्षण सत्राच्या सुरुवातीस मुख्य कार्यकारी अधिकारी
अभिनव गोयल यांनी सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना मनुष्यबळ विकासानुषंगाने कर्मचाऱ्यांना
त्यांच्या विविध क्षमता वृद्धसाठी प्रशिक्षणाचे महत्व नमूद करून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात पुर्ण वर्षभरात आयोजित
करावयाच्या विविध कार्यक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पुढील टप्प्यात आयोजित
करावयाच्या सर्व तांत्रिक तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणसत्रांच्या आयोजनाबाबत
विभाग प्रमुखांना निर्देश दिले.
सदर प्रशिक्षणास जिल्हा मुख्यालयातील एकूण 200 अधिकारी,
कर्मचारी सहभागी होते. प्रशिक्षणामध्ये कर्मचाऱ्याना कार्यानयीन कामकाज पार पाडतांना
नवनवीन शासन निर्णय, परिपत्रके, अधिनियम इत्यांदी नियमातील झालेल्या सुधारणा ई. बाबींची
अद्ययावत ज्ञान असणे, त्याच बरोबर लिपीकवर्गीय कर्मचारी यांना दैनंदिन कामकाज पार पाडतांना
येणा-या अडचणी अडचणींची सोडवणूक करण्यानुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
त्याचबरोबर प्रशिक्षणामध्ये टिपणी, पत्रव्यवहार, संचिका
बांधणी, म.ना.से (रजा) नियम १९८१, लेखासंहिता १९६८ म.ना.से. (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर
सेवा, निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे काळातील प्रदाने) नियम १९८१, म.जि.प.जि.
से (शिस्त व अपील) नियम १९६४ व म.जि.प. जि.से. (वर्तणूक) नियम १९६७, सहा गट्ठा पद्धत,
गोपनिय अहवाल लिहणे व जतन करणे, अभिलेख वर्गीकरण तसेच पंचायत राज सेवार्थ ई. विषयानुषंगाने
प्रशिक्षण देण्यात आले.
****
Comments
Post a Comment