विशेष मोहिमे अंतर्गत रेशनधारकाच्या मोबाईल, आधार क्रमांकाचे सिडींग शंभर टक्के पुर्ण करावे --जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन
*विशेष
मोहिमे अंतर्गत रेशनधारकाच्या मोबाईल, आधार क्रमांकाचे*
*सिडींग
शंभर टक्के पुर्ण करावे*
*--जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन*
§ *22
सप्टेंबर, 2022 रोजी एक दिवस विशेष मोहिमेचे आयोजन*
*लातूर,दि.21 (जिमाका):-*
प्रत्येक रेशनकार्डमध्ये लाभार्थ्याचे शंभर टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल
क्रमांक सिड करण्याच्या उदीष्टाने जिल्ह्यात दिनांक 22 सप्टेंबर, 2022 रोजी एक दिवस विशेष मोहिम
राबविण्यात येत आहे. ईकेवायसी (EKYC) पडताळणी व मोबाईल सिडींग सुविधा वापरण्याची कार्यप्रणाली
स्वस्त धान्य दुकानदारांना कळविण्यात आलेली आहे. आवश्यक तेथे ही सुविधा वापरण्याताबाबतचे
प्रशिक्षण दुकानदारांना देण्यात येत आहे. आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्याचे अनुज्ञेय
धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित होण्याची शक्यता नाकारता येणार
नाही. सदर बाब म्हणुन लाभार्थी अन्नधान्यापासुन वंचित राहु नये यासाठी आधार आणि मोबाईल
क्रमांक सिडींग शंभर टक्के पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.
तसेच ज्या शिधापत्रिकांवर मागील सलग 3 महिन्यांत धान्य
उचलण्यात आले नाही, अशा सर्व शिधापत्रिका तात्पुरती निलंबित करण्यात येईल किंवा धान्य
अनुदान नसलेल्या योजनेत वर्ग करण्यात येणार आहे. धान्य उचलण्यात न आलेल्या सर्व शिधापत्रिका
सप्टेंबर नंतर कायमस्वरुपी निलंबित करण्यात येईल. त्यामुळे आधार व मोबाईल क्रमांक सिडींग
पुर्ण करण्याची कार्यवाही लाभार्थ्यांनी तात्काळ पुर्ण करावे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील
शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईलचे
क्रमांक व आधार सिडींग शंभर टक्के पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सुचना आहेत. लातुर
जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेच्या सुमारे 20.38
लक्ष लाभार्थ्यापैकी 93.37 टक्के लाभार्थ्याचे आधार सिडीग झाले आहेत. शासन निर्देशानुसार
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी जिल्ह्यात मोहिम राबवून लाभार्थ्याचे
आधार व मोबाईल सिडींग करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वस्त धान्य दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील
ईकेवायसी (EKYC) व्दारे आधारसिडींग व मोबाईल सिर्डींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार
व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविण्यात येत आहे.
माहे जानेवारीचे धान्याचे वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाव्दारे
स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामार्फत कुटुंबातील सदस्याचा आधार सिड नसल्यास अशा सदस्याचा
आधार व मोबाईल क्रमांकाचे लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी
जावुन सिडींग पुर्ण करुन घ्यावे.
****
Comments
Post a Comment