सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी लॉगिनवरून महाडीबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृत्तीसाठी अर्ज सबंधीत महाविद्यालयामार्फत सादर करावेत

 

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता

प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी लॉगिनवरून महाडीबीटी पोर्टलवर  

नवीन शिष्यवृत्तीसाठी अर्ज सबंधीत महाविद्यालयामार्फत सादर करावेत

n  *सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे आवाहन*

 

           *लातूर,दि.24(जिमाका):-* जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनूदानित, विनाअनुदानित, कायम  विनाअनुदानित महाविद्यालयाचे  प्राचार्य तसेच या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती  व शिक्षण शुल्क (Freeship), राजर्षि शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यावसायिक पाठ्ययक्रमाशी संलग्ण असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेचे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज भरण्याकरीता महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी पोर्टल दिनांक २१ सप्टेंबर, २०२२ पासून सुरू करण्यात आलेले आहे.

सर्व प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यी यांनी  विद्यार्थी लॉगिन वरून नवीन तसेच नुतनीकरणाचे ऑनलाईन आवेदन पत्र भरून मंजूरीकरीता आपल्या सबंधीत महाविद्यालयामार्फत या कार्यालयास ऑनलाईन फॉरवर्ड करण्यात यावे असे आवाहन  सहायक आयुक्त समाजकल्याण एस.एन.चिकुर्ते, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले  आहे.

           ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना काही अडचण उदभवल्यास सर्वप्रथम सबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्र (Equal Opportunity Centre )  मदत घ्यावी, अडचणीचे निराकरण न झाल्यास या विभागाचे शिष्यवृत्ती शाखेशी संपर्क करावा.

ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर यापुर्वी अधार संलग्नित युजर आयडी तयार करून अर्ज भरलेले आहेत  अशा विद्यार्थ्यांनी नवीन नॉन आधार युजर आयडी तयार करू नये .नवीन नॉन आधार युजर आयडीवरून अर्ज नुतणीकरण केल्यास व एकापेक्षा जास्त युजर आयडी तयार केल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयाची राहील.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु