स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पंडीत दीनदयाल उपाध्याय येत्या 27 व 28 सप्टेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळव्याचे आयोजन

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पंडीत दीनदयाल उपाध्याय

येत्या 27 व 28 सप्टेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळव्याचे आयोजन

         *लातूर,दि.24(जिमाका):-*  जिल्हा कौशलय विकास ,रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र लातूर,यांच्या मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  निमित्य आयोजित पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 27 ते 28 सप्टेंबर 2022 रोजी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अयोजित  करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यासाठी ‍ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयेाजन करण्यात आले आहे.

                 वरील सर्व नामांकीत कंपनीतील उद्योजकांची  रिक्तपदे निहाय इच्छुक उमेदवारांनी दिनांक 27 ते दि. 28 सप्टेंबर 2022 रोजी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने पसंती क्रमांकानूसार अप्लाय करावे.व या सुवर्ण संधीचा लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशलय विकास, रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्र,लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले  आहे.

               या मेळाव्यात रोजगार देणारे उद्योजक हे लातूर जिल्ह्यातील आस्थापना / उद्योजक यांनी एकुण 110 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.  

इक्विनॉक्स टेक्नॉलॉजीज लातूर (EQUINOX TECHNOLOGIES LATUR), एकूण ३० जागा पात्रता एस.एस.सी., एचएससी कोणतीही पदवी / डिप्लोमा, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड लातूर, एकूण ५० जागा पात्रता (JAY INDUSTRI LATUR) जय इंडस्ट्री लातूर एकूण ३० जागा पात्रता एस.एस.सी/आयटीआय (SSC/ITI) या नामांकीत कंपन्यांनी रिक्त पदे अधिसूचित केली आहेत. या साठी दहावी व बारावी ग्रज्युएट / डिप्लोमा / आय.टी.आय इत्यादी शैक्षणिक पात्रतेसाठी आवश्यक मणुष्यबळाची आवश्यकता आहे.

                 अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्र,या कार्यालयाच्या 02382 -299462  या दुरध्वनी क्रमांकावर सपर्क साधावा असेही पत्रकात नमुद केले आहे.

****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु