कर्करोग शोध व निदानासाठी संजीवनी अभियान* *मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाअंतर्गत जिल्हा परिषदेचा उपक्रम*
*कर्करोग शोध व निदानासाठी संजीवनी
अभियान*
*मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत
महोत्सवाअंतर्गत जिल्हा परिषदेचा उपक्रम*
*लातूर दि.17(जिमाका) :-* बदलत्या जीवनशैली व आरोग्य संबधी अज्ञान यामुळे महिला मधील कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसन येते. यात यासाठी प्राधान्य मिळावे व महिला मधील स्तनाचा कर्करोग तसेच गर्भाशय मुख कर्करोगाचे निदान होणसाठी जिल्हा परिषद आरोग्य मार्फत संजीवनी अभियान राबविले जात आहे.त्याची सुरफवात आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्याने करण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अति.मुख्य
कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नाकर जवळगेकर,
उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) नितीन
दाताळ, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे,
अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी बरफरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती
ए.सी.पंडगे सहा., जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.सतीश हरीदास उपस्थित होते.
या मोहिमेत सर्व गाव पातळीवर आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक 30
वर्षावरील महिलांची गृह भेटीतून माहिती घेतली जाणार आहे. यात संशयित महिलाना
तालुका पातळीवर विशेष शिबीरे राबवुन वेळेत निदान केले जाणार आहेत. यासाठी शासकिय
आरोग्य यंत्रणा, खाजगी, वैदयकिय संस्था, कर्करोगासाठी अग्रेसर सामाजीक संस्था,
यांची मदत घेतली जाणार आहे. हे अभियान यशस्वी करण्याकरिता विभागीय आयुक्त सुनिल
केंद्रेकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उपसंचालक आरोग्य सेवा श्रीमती डॉ.कमल
चामले, यांनी अभियान यशस्वीपणे राबविण्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
****
Comments
Post a Comment