लातूर जिल्ह्यात निर्यात वाढीसाठी कार्यशाळा व प्रदर्शन संपन्न
लातूर जिल्ह्यात निर्यात वाढीसाठी कार्यशाळा
व प्रदर्शन संपन्न
लातूर दि.29 (जिमाका) :- नुकतेच
(दि. 27 व दि.28सप्टेंबर, 2022 रोजी) निर्यात वृद्धी, उद्योग विषयक गुंतवणूक वृद्धी,
एक जिल्हा एक उत्पादन व व्यवसाय सुलभीकरण (EODB) निर्यात कार्यशाळा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
तसेच तूर जिल्ह्यातील उत्पादीत निर्यातक्षम
मालाचे दिनांक 27 व दि. 28 सप्टेंबर, 2022 या दोन दिवस रेणापूर येथील मसाला उद्योग,
कलंत्री इंडस्ट्रीज यांचे दाळ उत्पादन, बिदादा यांचे किशोर ॲग्रो इं. दाळ उत्पादन,
बिंदगीहाळ येथील शॅनेटरी नॅफकिन, ऑक्टागन यांचे खाद्य तेल, बी.एल.जे यांचे पाईप, वैशाली
सेल्स यांचे टुल्स, दिनकर पाटील यांचा मध उद्योग, सोलार क्लस्टर यांचे सोलार पॅनल,
दुधाळे यांचे फॅब्रीकेशन उत्पादने, श्री मोरे यांचे डिटर्जंट पावडर, प्रितम जाधव यांचे
लोणचे, भारती यांचे फॅशन डिझायनिंग, पवार यांचे बंजारा वर्क इत्यादी 40 उत्पादीत मालाचे स्टॅाल यांचे प्रदर्शनही
संपन्न झाले.
या कार्यशाळेचे महाव्यवस्थापक पी.डी.हनबर
यांनी प्रस्ताविक केले व कार्यशाळेचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निर्यात प्रचलन
समिती, लातूर यांचे हस्ते उद्घाटन झाले व यांनी प्रदर्शनास भेट देवून पहाणी केली व
निर्यात संबंधी अडीअडचणीबाबत विचारणा केली व सविस्तर असे निर्यात वाढीसाठी मार्गदर्शन
केले. तसेच निर्यातदारांनी मांडलेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे
जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निर्यात
सुविधा मैत्री कक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील उद्योगांच्या उत्पादनाच्या
निर्यात वाढीसाठी जलद कृती आराखडा तयार करून जिल्ह्यातून उत्पादनांची जास्तीत जास्त
निर्यात करण्यावर भर देण्यात येईल असेही सांगितले.
उद्योग सहसंचालक, विभाग औरंगाबाद बी.टी.यशवंते
व अधीक्षक उद्योग अधिकारी, उपविभागीय कार्यालय, नांदेड नितीन कोळेकर, यांची प्रमुख
उपस्थिती होती.
जिल्ह्यातील उद्योगांचा आढावा घेऊन शासन
स्तरावर उद्योगांसाठी राबवण्यात येणारे योजना, क्लस्टर याबाबत माहिती दिली. श्री सोनवणे - द्राक्ष निर्यातदार शेतकरी
यांनी निर्यातीत येणा-या अडीअडचणी मांडल्या.
निर्यातदार उद्योजक नितीन कलंत्री, बिदादा-
दाळ निर्यातदार उद्योजक यांनी दाळ निर्यातीत येणाऱ्या अडी-अडचणी मांडल्या. अमोल धवन
- ADM Agro, लातूर, कांचन कुलकर्णी-निर्यात सल्लागार, डॉ. गोविंद हांडे, कृषि निर्यात
तज्ञ, नानासाहेब पवार- मैत्री, श्री ढोबे- DGFT, शिवाजी राठोड-विभागीय अधिकारी, मऔविम,
लातूर, अधिक्षक जिल्हा कृषि अधिकारी गावसाणे, मिटकरी-EY मुख्य सल्लागार, श्री पळणीटकर-मुख्य
व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, लातूर यांनी सदर कार्यशाळेस उपस्थित राहून
निर्यात विषयक तज्ञांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले. तसेच मिटकॉनचे के.जी.कप्ते
यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडील योजनांची सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेमध्ये निर्यात विषयक जिल्ह्यातील प्रमुख निर्यातदारानी मार्गदर्शन, अनुभव
सांगितले. त्यामध्ये निर्यात प्रक्रिया, दस्तऐवज नियम, प्रोत्साहन,
निर्यात करणे सोपे कसे होईल व केंद्र शासनाकडून मिळणा-या सवलती याबाबत कांचन कुलकर्णी
तज्ञ सल्लागार यांनी मार्गदर्शन केले. EODB व MIDC बाबत नानासाहेब पवार मैत्री
व शिवाजी राठोड-विभागीय अधिकारी, MIDC यांनी मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रातील निर्यात संधीचे सादरीकरण
व जिल्हानिहाय उत्पादनांशी संबंधित EPCS द्वारे निर्यात प्रोत्साहनासाठी क्षेत्र आणि
समर्थन बाबत डॉ. गोविंद हांडे-तत्र कृषी सल्लागार यांनी मार्गदर्शन केले. एक जिल्हा
एक उत्पादन बाबत व कृषी उत्पादन निर्यात बाबत गावसाणे-अधिक्षक जिल्हा कृषि अधिकारी
यांनी मार्गदर्शन केले. एक जिल्हा एक उत्पादन जिल्हयासाठी गुंतवणूक प्रोत्साहन धोरण
बाबत सादरीकरण व माहिती मिटकरी EY मुख्य निर्यात सल्लागार, निर्यातक्षम उद्योगासाठी
आर्थिक सहाय्य देण्याबाबत पळणीटकर, मुख्य व्यवस्थापक, SBI यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी उद्योग संघटनांचे प्रदीप
पाटील खंडापुरकर, श्री. मानधना, श्री. लोहीया, प्रविण सगर तसेच सदर कार्यशाळेत निर्यातदार,
निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती,
निर्यातदार व प्रगतीशील शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, राज्य
शासनाचे अधिकारी, निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात विषयक कामकाज करणारे सर्व
घटक, व्यापारी, बँका इ. यांनी सदर कार्यशाळेसाठी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या शेवटी
के.जी.कप्ते, मिटकॉन, लातूर यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच निर्यातक्षम उद्योग
यांनी त्यांच्या वेगवेगळया उत्पादीत मालाचे दोन दिवस स्टॉल लावले.
***
Comments
Post a Comment