सेवा पंधरवाडा विशेष मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर

 

सेवा पंधरवाडा विशेष मोहिमेतंर्गत

               जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर

 

*लातूर दि.20(जिमाका):-* ‘सेवा पंधरवाडा’ विशेष मोहिमेअंतर्गत दिनांक  17 सप्टेंबर,2022 ते दि. 2 ऑक्टोबर 2022 या  कालावधीत लातूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर  व दिनांक  21 सप्टेंबर जागतिक स्मृतीभ्रंश दिन (World Alzheimer’s Day) दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राव्दारे संचलित मातोश्री वृध्दाश्रम आर्वी  ता. जि. लातूर येथे दिनांक 21 सप्टेंबर, 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता करण्यात आलेले आहे.  

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी सदरीलल आरोग्य तपासणी शिबीर व 21 सप्टेंबर - जागतिक स्मृतीभ्रंश दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयातील समाज कल्याण निरिक्षक संदेश घुगे, मो.न. 9405446216 व (क.लि.)  पाटील एम. व्ही. मो.नं.9637734377 तसेच या कार्यालयातील तालुका समन्वयक नागेश जाधव मो.नं. 9503388667 यांच्‍याशी संपर्क साधावा असेही या पत्रकात नमुद केले आहे.

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु