एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 अंतर्गत सामूहिक शेततळे घटकांसाठी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
*एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 अंतर्गत*
*सामूहिक शेततळे घटकांसाठी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन*
*लातूर,दि.5(जिमाका)*एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामुहिक शेततळे हा घटक फलोत्पादन पिकासाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे व या उद्येशाने 100 टक्के अनुदानावर राबिवण्यात येत आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समुहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे अनुदान देय आहे.
सामूहिक शेततळे घटकांसाठी आकारमाननिहाय
देय अनुदान पुढील प्रमाणे आहे. आकारमान (मी) 34 x34 x4.7 फलोत्पादन
क्षेत्र (हे.) 2 हेक्टर ते 5 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त अनुदान लाखात- 3 लाख
39 हजार रुपये, आकारमान (मी) 24 x24 x4 फलोत्पादना
क्षेत्र (हे.) 1 हेक्टर ते 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त अनुदान लाखात- 1 लाख
75 हजार रुपये असे आहे.
त्यानूसार महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. संगणक/ लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावयाचे आहे. त्याकरीता पोर्टलवर अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे सातबारा, आठ अ, बँक पासबुक व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे.
सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,लातूर कार्यालयातील तंत्र सहाय्यक- फलोत्पादन, विकास बालकुंदे संपर्क क्र.9823238338 व आपल्या तालूक्यातील तालूका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,लातूर यांनी केले आहे.
000
Comments
Post a Comment