सेवा कर्तव्यपथ पंधरवडा" निमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न
सेवा कर्तव्यपथ पंधरवडा" निमित्त
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न
*लातूर,दि.30(जिमाका):-*सामाजिक
न्याय विभागामार्फत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता
दि. 17सप्टेंबर 2022 ते 02 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये सेवा कर्तव्यपथ पंधरवडा म्हणून
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विदयार्थ्यांना स्पर्धा
परिक्षा व इतर परिक्षा बाबत माहिती होणेसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरचे आयोजन
करणे बाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत.
आयुक्त,
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ. श्री. प्रशांत नारनवरे, यांच्या
मार्गदर्शनातून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूर या कार्यालयामार्फत विदयार्थ्यांसाठी
दि. 25सप्टेंबर,2022 रोजी लातूर येथील 1 हजार मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रं. 1,2,3
व 4 एम.आय.डी.सी.लातूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमाला
अध्यक्ष म्हणून प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, लातूर अविनाशजी देवसटवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी
युवराज पाटील
लातूर
व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण शिवकांत चिकुर्ते हे उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख
मार्गदर्शक म्हणून प्रतीक पितांबरे हे उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये
उपस्थित मान्यवरांनी विदयार्थ्यांना विविध स्पर्धा परिक्षा / तांत्रीक शिक्षण/ व्यवसायिक
शिक्षण अशा अनेक विषयाबाबत मार्गदर्शन केले व लातूर जिल्ह्याचा जसा शिक्षण क्षेत्रामध्ये
पॅटर्न आहे तसा स्पर्धा परिक्षेमध्ये सुध्दा लातूर पॅटर्न निर्माण होणेसाठी विदयार्थ्यांनी
त्या प्रमाणे तयारी करणे बाबत आवाहन केले.
सदर कार्यक्रमास प्रादेशिक उपायुक्त, समाज
कल्याण विभाग, लातूर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, लातूर या कार्यालयातील अधिकारी,
कर्मचारी तसेच 1 हजार मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रं.1,2,3 व 4 एम.आय.डी.सी.
लातूर येथील गृहप्रमुख व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
000
Comments
Post a Comment