लातूर पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याचे वेळापत्रक निश्चित
लातूर पाटबंधारे
विभागाकडून
पाणी सोडण्याचे वेळापत्रक
निश्चित
*लातूर दि. 1 (जिमाका)* लातुर पाटबंधारे विभाग क्रं 1 लातुर या विभागाअंतर्गत मोठे प्रकल्प (1)मांजरा प्रकल्प, 2) तेरणा प्रकल्प) (एकुण-02)
मध्यम प्रकल्प (1) तावरजा प्रकल्प 2) मसलगा प्रकल्प (एकुण-02) व तसेच 33 टक्के पेक्षा जास्त जिवंत पाणीसाठा उपलब्ध असलेले
लघु प्रकल्प, साठवण तलाव व बॅरेजेस (या विभागाच्या कार्यक्षेत्रातील लाभक्षेत्रातील)
सिंचन लाभधारकांना आवाहन करण्यात येते की, संबधित प्रकल्पातील पाणीसाठा उपलब्धनुसार,प्रकल्पीय
पीक रचनेनुसार पाणी देण्याचे नियोजन आहे. संबधित प्रकल्पातील पाणीसाठा व प्रकल्पीय
पिकरचना व प्रकल्पनिहाय देण्यात येणाऱ्या पाणीपाळीची माहिती संबधीत शाखा कार्यालयास पाहावयास मिळेल.
उपलब्ध पाणीसाठयापैकी पिण्यासाठी वापरासाठी
प्राधान्याने आरक्षित केलेले पाणीसाठा वगळता
उर्वरीत पाणीसाठा सिंचनासाठी वापरला जाईल.
सर्व लाभधारकांनी पाणी अर्ज नमुना 7 व
7 अ, शासनाने सुधारित केलेल्या नमुण्यात संबधित शाखा अधिकारी यांचे कार्यालयास दि
12 सप्टेंबर 2022 पर्यंत पाणी अर्ज भरुण शाखा कार्यालय किंवा बिटप्रमुखाकडे सादर करावेत
तसेच,कमी पाण्यात येणारे खरीप हंगामी ज्वारी व उभी पिके व लाभक्षेत्रातील प्रवाही
वरील उभा उस (हंगामी मंजुर) कालावधी 01 जूलै 2022 ते 14ऑक्टोंबर 2022 हा राहील.तसेच
केवळ कालव्याच्या पाण्यावर विसंबून न राहता विहीर व बोरचा आधार असल्यासच जास्त पाण्याची
गरज असणारी पिके घेण्यात यावे. अन्यथा होणा-या संभाव्य नुकसाणीस जलसंपदा विभाग जबाबदार
राहणार नाही याची नोंद घेवुन जलसंपदा विभागास सहकार्य करावे.
तसेच
सदयस्थितीत लातुर पाटबंधारे विभाग क्रं.1
लातुर अंतर्गत अत्यंत कमी प्रमाणात कर्मचारी असुन प्रत्येक शाखा कार्यालयात केवळ
1 ते 2 कर्मचारी कार्यरत आहेत. सबब लाभधारकांना विनंती करण्यात
येते की, त्यांनी स्वत: पुढाकार घेवुन शाखेत
किंवा उपविभाग , विभागीय कार्यालयात येवुन
सिंचनासाठी पाणी मागणी करावी तसेच
ज्या ज्या ठिकाणी शक्य असल्यास शाखेतील कर्मचारी यांच्याकडुन ग्रामपंचायत कार्यलयात प्रत्याक्षात पाणी मागणी अर्ज
उपलब्ध् करुण देण्याचे नियोजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
अटी व शर्ती पूढील प्रमाणे आहे. ज्या जमिणीसाठी पाणी
मागणी करावयाची आहे त्या जमिणीचा मालक असला
पाहिजे. पाणी अर्जासोबत सातबारा उतारा सादर करावा. पाणी अर्जासोबत मागिल थकबाकी पुर्ण
भरावी व रितसर पावती घ्यावी. पाणी मागणी क्षेत्र 0. 20 आर च्या पटीत( कमित कमी
0.20 आर क्षेत्र) असावे, तसेच अर्जासोबत थकबाकी
पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी अर्ज मंजूर करण्यात
येईल.
पाणी अर्ज मंजुर झाल्यानंतर पिकास पाणी
घ्यावे.आपआपल्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी संबधित बागायतदाराची राहील. शेतचारी नादूरुस्त असल्यास मंजुरी दिली जाणार
नाही. व पाणी दिले जाणार नाही. मंजुरीपेक्षा
जास्त क्षेत्र सिंचीत केल्यास हंगांमी दराच्या दिड्पट दराने आकारणी केली जाईल. पाणी अर्ज न देता पाणी घेतल्यास बिनअर्जी
क्षेत्राचे पंचनामे करुन दंडनीय दराने आकारणी करण्यात येईल .
कालव्यावरील उपसा सिचन परवाना धारकाने
त्यांचे मंजूर क्षेत्रास ठरवुन दिलेल्या तारखेस पाणी कालव्याच्या शेवटपासुन ते सुरवात
(Tail to Head) या प्रमाणे घ्यावे.सिंचन नियोजन
असल्यास मंजुर कालावधी सोडुन मॊटारी सुरु ठेवल्यास सिंचन अधिनियम 1976 चे कलम 97 नुसार
विद्युत पुरवठा खंडीत करणे,विद्युत मोटारी जप्त करणे,पाणीपरवाना रद्द करणे,व बिगर पाळी
पंचनामा करणे अनिवार्य ठरेल याची नोंद घ्यावी.
शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या प्रचलीत पाणीपट्टीच्या दराने आकारणी करण्यात
येईल व त्यावर 20टक्के स्थानीक कर आकारला
जाईल. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा काही अपरिहार्य कारणामुळे अथवा तांत्रिक कारनास्तव
पाणीपुरवठा शक्य न झाल्यास व त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयावर
राहणार नाही. तसेच कांही अपरिहार्य कारणास्तव / तांत्रीक अडचणी उदभवल्यास सदर जाहीर निवेदनाव्दारे देण्यात आलेल्या
पाणी पाळीच्या नियोजनामध्ये बदल करण्याचे हक्क
सदर निम्ण स्वॉक्षरीतांनी राखुन ठेवलेले आहेत.
उपसा सिंचन परवाना धारकांनी इतरांना पाणी
दिल्यास व दिलेला सिंचन परवान्यावर विदुत मोटार
5 एच पी पेक्षा जास्त विदुत मोटार एच पी आढळल्यास
सिंचन परवाना रद्द करण्यात येईल. जबरदस्तीने
अथवा विनापरवानगी गेट उघडल्यास,कालवा फोडुन पाणी घेतल्यास पाटबंधारे अधिनियम 1976 चे खंड क पोटकलम क व ख अन्वये दंडात्मक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. पाटबंधारे विभागामार्फत जाहीर आवाहन करण्यात येते की, कालव्यावरील उपसा
व ठिबक सिंचन पाणी परवानाधारकांचे पाणी अर्ज प्रथम प्राधाण्याने मंजुर करुण एकपट दरानेच अकारणी करण्यात येईल.
तसेच
ज्या लाभधारकांचे पाणी परवाने उपलब्ध नाहीत त्या लाभधारकांस विना परवाना व अनाधिकृत
पाणी उपसा समजून संबधितास दिडपट दराने अकारणी करण्यात येईल. त्यामुळे कार्यक्षेत्रातील
जास्तीत जास्त लाभधारकांनी पाणी परवाने घेवुनच सिंचनासाठी पाणी घ्यावे
व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे. असे अवाहन उपकार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे
विभाग क्र. 1. लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
000
Comments
Post a Comment