औद्योगिक प्रशक्षिण संस्थेतील प्रशिक्षणार्थी

नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा तयार व्हायला पाहिजे

                                                                        -- गटनिदेशक तथा प्रशिक्षण अधिकारी एम. के. सूर्यवंशी

 

लातूर दि.20(जिमाका):- संस्थेतील ट्रेडची  माहिती व रोजगाराच्या, नोकरीच्या संधी यासंबंधी  सखोल माहिती दिली. तसेच त्यांनी आयटीआयमधील प्रशिक्षित झालेला प्रशिक्षणार्थी हा नोकरी मागणारा नसून नोकरी देणारा तयार व्हायला पाहिजे अशा पद्धतीचे पालक मेळाव्यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन गटनिदेशक तथा प्रशिक्षण अधिकारी एम. के. सूर्यवंशी यांनी संबोधित केले.

देवणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विश्वकर्मा दिन व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रधानमंत्री कौशल्य विकास, उद्योजकता दिक्षांत समारंभ (अंतिम प्रमाणपत्र वितरण) व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना विविध समाज माध्यम, उद्योजक यांची समर्पक उदाहरणे देऊन स्वयंरोजगार व रोजगार निर्मितीचे महत्व विषद केले. तसेच विविध कौशल्ये आत्मसात करून एक यशस्वी उदयोजक होण्याचा मंत्र नायब तहसीलदार विलास तरंगे यांनी दिला.

याप्रसंगी नायब तहसिलदार विलास तरंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे गटनिदेशक तथा प्रशिक्षण अधिकारी एम के. सुर्यवंशी होते.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शि.नि. जोडारी निंबाळकर एम.बी. नी केले. स्वागत गीत गायन शि.नि. जोडारी कु. चामलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन शि.नि. विजतंत्री पंडित पी.एम. यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सहा. भांडारपाल आनंद कोळी, कनिष्ठ लिपिक गुळवे बी., कंदले एम.आर. , बंडगर जी. के., पोतदार एन., चव्हाण एस., हाशमी ए.ए.,कर्मचारी वायचळकर विवेक, श्रीमती कापडे यासह संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु