संयुक्त क्षयरोग, कुष्ठरोग रुग्ण शोध मोहिम
*लातूर,दि.13(जिमाका):-* संयुक्त
कुष्ठरोग शोध अभियान एलसीडीसी व सक्रिय क्षयरोग शोध मोहिम एसीएफ दि. 13 सप्टेंबर
ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत आरोग्य कर्मचारी, आशा व स्वंयसेवक यांच्या मार्फत
गृहभेटी व्दारे सर्वेक्षण करुन लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
या
सर्व मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन प्रा.आ.कें. गंगापूर अंतर्गत आरोग्य वर्धिनी
उपकेंद्र पाखरसांगवी येथे नुकतेच मुख्य
कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसंचालिका,
आरोग्य सेवा परीमंडळचे डॉ. श्रीमती कमल चामले या प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित
होत्या. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी आशा व पुरुष
स्वयंसेवक यांनी प्रत्यक्ष घरोघरी भेटी देवून महिला व पुरुष यांची संपूर्ण तपासणी
करुन यामध्ये लक्षणे आढळणाऱ्या सर्व संशयित कुष्ठरोग, क्षयरोग रुग्णांची यादी करुन
त्यांची पूढील तपासणी व उपचार सर्व शासकीय रुग्णालयात मोफत करण्यात येणार असल्याचे
सांगितले.
या मोहिमेत
आशा व पुरष स्वंयसेवक यांची 1 हजार 742 पथके तयार करुन जिल्ह्यातील 22 लाख 60 हजार
173 इतक्या लोकसंख्येची प्रत्यक्ष तपासणी गृहभेटी व्दारे करण्यात येत आहे.
सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख, सहाय्यक
संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. श्रीमती ए.सी. पंडगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी
डॉ. श्रीमती ए.जी. परगे वैद्यकीय अधिकारी ,कुष्ठरोग तसेच संबधीत प्राथमिक आरोग्य
केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप इगे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0000
Comments
Post a Comment