चला जबाबदारी पार पाडूया, मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड आजच जोडूया...!

 

चला जबाबदारी पार पाडूया,

मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड आजच जोडूया...!

मतदान ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करावे

- उपविभागीय अधिकारी सुनिल यादव यांचे आवाहन

 

§  *सर्व गणेश मंडळाच्या ठिकाणी श्रीगणेशाची आरती झाल्‍यानंतर आधार जोडणी व प्रमाणिकरण* करावे*

 

            *लातूरदि.7(जिमाका)* मा. भारत निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्रासोबत आधार लिंक करण्याची सर्वव्यापी विशेष मोहीम आयोजित केलेली आहे. त्‍याअनुषंगाने दिनांक 5 सप्टेंबर, 2022 रोजी लातूर तालुक्यातील महाविद्यालयाचे नोडल अधिकारी (निवडणूक), सामाजिक सेवाभावी संस्‍थेचे अध्‍यक्ष, महा ई-सेवा केंद्राचे संस्‍था चालक यांची तहसीलदार स्‍वप्‍नील पवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

 या बैठकीत मतदान ओळखपत्रास आधार लिंक करण्यासंदर्भात लातूर शहर महानगरपालिका, लातूर यांना पालिकेच्‍या घंटा गाडीवर मतदान ओळखपत्रास आधार लिंक करण्यासंदर्भात जिंगल चालू करून त्‍यामार्फत प्रसार करण्याबाबत, लातूर तालुक्यातील महाविदयालयाचे प्राचार्य यांना एनएसएस (NSS) च्या विद्यार्थ्यांमार्फत मतदान ओळखपत्रास आधार लिंक करणे संदर्भात दिंडीचे आयोजन करण्याबाबत, सर्व सेवाभावी संस्‍थेचे अध्‍यक्ष यांना जनजागृती करून व्‍यापक प्रसिध्‍द देण्याबाबत, तसेच महा ई-सेवा केंद्राचे संस्‍थाचालक यांना त्‍यांच्‍याकडे आलेल्‍या प्रत्‍येक नागरिकास मतदान ओळखपत्रास आधार लिंक करण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्याबाबत व प्रत्‍येक ई-सेवा केंद्रात मतदान ओळखपत्रास आधार लिंक करण्याबाबतचे बाबतचे बॅनर लावणे बाबत निर्देश देण्‍यात आले.

       लातूर तालुक्‍यातील 248 रास्‍तभाव दुकानदार यांना देखील मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी बीएलओ (BLO) सोबत घेऊन जास्‍तीत जास्‍त मतदारांचे मतदान ओळखपत्रास आधार लिंक करुन घेण्‍याच्या सुचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. तसेच सध्‍या गणेश उत्‍सव कार्यक्रमासंदर्भात सर्व गणेश मंडळाचे ठिकाणी सकाळी, दुपारी, संध्‍याकाळी आरती झाल्‍यानंतर आधार जोडणी व प्रमाणिकरण करणेसाठीचे अवाहन जिंगल्स लावण्याबाबत देखील कळविण्‍यात आलेले आहे.

 लातूर तालुक्‍यातील सर्व मतदान केंद्राचे ठिकाणी आगामी काळात विशेष मोहिमेच्‍या तारखा निश्चित करण्‍यात येणार असून सदर दिवशी सर्व मतदारांनी आपले मतदार ओळखपत्र व आधार क्रमांक मतदान केंद्राचे ठिकाणी घेऊन येऊन मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी बीएलओ (BLO) यांचे मार्फत गरुडा अॅप वर किंवा वोटर हेल्पलाईंन ॲप (Voter helpline App) या प्‍ले स्‍टोअरमधील अॅपचा वापर करुन 100 टक्के आधार लिंक करुन घेण्याच्या सुचना देण्‍यात आलेल्‍या आहेत.

       मा. मुख्‍य निवडणूक अधिकारी महाराष्‍ट्र राज्‍य यांनी माहे सप्‍टेंबर, 2022 अखेर ज्‍या मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी बीएलओ (BLO) यांचे मतदार यादी आधार जोडणी व प्रमाणिकरण 100 टक्के पुर्ण होणार आहे अशा बीएलओ (BLO) यांना सन्‍मानपत्र देऊन गौरविण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले आहे.  

तरी मतदान ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करावे असे आवाहन लातूर तालुक्‍यातील सर्व नागरिकांना उपविभागीय अधिकारी लातूर, सुनिल यादव तहसीलदार लातूर स्‍वप्‍नील पवार, नायब तहसीलदार (निवडणूक) कुलदीप देशमुख, लातूर यांच्‍यावतीने आवाहन करण्‍यात येत आहे.  

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु